Pune Crime News | लोणावळ्याच्या हॉटेलमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, हॉटेल मालकासह महिलेवर गुन्हा

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लोणावळ्यात (Lonavala Crime News) एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा (Prostitute) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी हॉटेल मालकासह एका महिलेच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

लोणावळ्यामधील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर (Old Mumbai Pune Highway) हॉटेल सुदर्शनमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक (IPS Satya Sai Karthik) यांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सदरील हॉटेलवर रेड केली. हॉटेलचा मालक सतीश शेट्टी (59) याच्यासह एका महिलेविरूध्द लोणावळा शहर पोलिस ठाण्यात (Lonavala City Police Station) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

यासंदर्भात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मारूती गोफणे (ASI Maruti Gofane) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक कारंडे (API Karande), सहाय्यक फौजदार मारूती गोफणे, अण्णा बनसोडे, हवालदार मसळे, शिंदे तसेच पोलिस पथकातील इतरांनी ही कारवाई केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास लोणावळा शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सीताराम डुबल अधिक तपास करीत आहेत.

 

खंडाळ्यात 68 हजारांचा मद्यसाठा जप्त

दरम्यान, पोलिसांनी खंडाळ्यात तब्बल 68 हजारांचा मद्यसाठा जप्त केला आहे. खंडाळ्यातील शिवाजी पेठ
परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मद्यसाठा करून विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी 69 हजार 200 रूपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे.
याप्रकरणी अजय रामचंद्र जांभुळकर (56, रा. शिवाजी पेठ, खंडाळा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून देशी आणि विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Prostitute racket busted in Lonavala hotel,
crime against woman along with hotel owner

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा