Pune Crime News | पुण्यात मराठी पाट्यांसाठी आंदोलन, मनसेच्या पदाधिकारी व कार्य़कर्त्यांवर डेक्कन, विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | दुकानांवरील इंग्रजी पाट्या हटवून मराठी पाट्यांसाठी आंदोलन (Agitation for Marathi Boards) करुन तोडफोड करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena (मनसे MNS) पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर पोलिसांनी (Pune Police) गुन्हे दाखल केले आहे. याप्रकरणी डेक्कन आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले आहेत. (Pune Crime News)

डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) ब्येनाराम मनारामजी देवासी (सपना बिल्डिंग, शाही भोजन हॉटेल, जंगली महाराज रोड, डेक्कन) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार साईनाथ संभाजी बाबर (Sainath Sambhaji Babar), कुलदीप ज्ञानेश्वर यादव (Kuldeep Dnyaneshwar Yadav), शाम सहदेव ताठे (Sham Sahdev Tathe), प्रविण बंडु मिसाळ (Pravin Bandu Misal), संदिप तुकाराम माने (Sandeep Tukaram Mane), प्रविण कुंडलीक सोनवणे (Pravin Kundlik Sonwane), राजेंद्र रामचंद्र वागस्कर (Rajendra Ramchandra Vagaskar), दादा साधु साठे (Dada Sadhu Sathe), योगेश विलास खडके (Yogesh Vilas Khadke) यांच्यावर आयपीसी 143, 145, 146, 147, 149, 427 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल केला आहे.

तर विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) स्वर्नेन्दु परितोष घोष (रा. गंगासवेरा, सिटी इनरनॅशनल स्कूलजवळ, वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे. यावरुन साईनाथ संभाजी बाबर, कुलदीप ज्ञानेश्वर यादव, शाम सहदेव ताठे, प्रविण बंडु मिसाळ, संदिप तुकाराम माने, प्रविण कुंडलीक सोनवणे, राजेंद्र रामचंद्र वागस्कर, दादा साधु साठे, योगेश विलास खडके यांच्यासह 10 ते 12 मनसे कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी पाट्या दुकाने, उपहारगृहांवर लावण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. मराठी पाट्या न लावल्याच्या निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात आंदोलन केले. मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांच्या पाट्यांची तोडफोड करुन काळे फासले.

जंगली महाराज रोडवरील (Jangli Maharaj Road) शाही भोजन हॉटेलच्या बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

इंग्रजी पाटीची तोडफोड केली. तसेच जंगली महाराज रोडवरील लेव्हीज शोरुम,
शुभम टाईम्स, बुट्टे पाटील ग्रुपने लावलेल्या इंग्रजी पाट्यांची तोडफोड केली.
सहायक पोलीस निरीक्षक वर्षा शिंदे (API Varsha Shinde) तपास करीत आहेत.

टिळक रोडवरील (Tilak Road) महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स शोरुमच्या इंग्रजी पाटीची तोडफोड केल्याप्रकरणी
विश्रामबाग पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी साईनाथ बाबर यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक बाळकृष्ण नाणेकर (API Balkrishna Nanekar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नवले पुलाजावळ पुन्हा अपघात, कंटेनरची पाच वाहनांना धडक; चार जखमी (Video)