Pune Navale Bridge Accident | नवले पुलाजावळ पुन्हा अपघात, कंटेनरची पाच वाहनांना धडक; चार जखमी (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Navale Bridge Accident | मुंबई-बंगळुरू बाह्यवळण (Mumbai-Bangalore Bypass) मार्गावर नवले पुलाजवळ शनिवारी सायंकाळी पुन्हा अपघात झाला आहे. एका कंटेनरने (आरजे 09 जीसी 8294) पाच वाहनांना धडक दिली. अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहे. भरधाव कंटेनरने एका मोटारीला दीड किलोमीटर फरफटत नेले. सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झाली नाही. अपघातानंतर या मार्गावर काहीवेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. (Pune Navale Bridge Accident)

याप्रकरणी रियाज यासीर अन्सारी Riaz Yasir Ansari (रा. पारगेनगर, कोंढवा खुर्द) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कंटेनर चालक आसम इलियास (रा. सतवारी, ता. पहाडी, जि. भरतपुर, राजस्थान) याच्यावर आयपीसी 279, 337, 338, 427, सह मोटार वाहन कायद्यांतर्गत (Motor Vehicle Act) गुन्हा दाखल केला आहे.

बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ शनिवारी (दि.2) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने शिवशाही बसला (Shivshahi Bus) धडक दिली. यानंतर डंपर, टेम्पो, मोटारीला धडक दिली. कंटेनरने मोटार दीड किलोमीटर पर्यंत फरफटत नेही. अपघातानंतर वाहनचालक भयभीत झाले. वाहनचालक तसेच नागरिकांनी कंटेनरचालकाला पाठलाग करुन पकडले. अपघातानंतर याभागातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police Station) घटनास्थळी धाव घेऊन कंटेनर चालकाला ताब्यात घेतले. (Pune Navale Bridge Accident)

वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic Police) अपघातातील वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.
या अपघातात चारणज जखमी झाले असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
सुदैवाने या घटनेत जीवीतहानी झाली नाही, अशी माहिती सिंहगड पोलिसांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मौजमजेसाठी चोरीच्या दुचाकी विक्री करणारे एजंट कोंढवा पोलिसांकडून गजाआड, 15 दुचाकी जप्त