Pune Crime News | पुणे : शोरुमच्या नावाने बनावट कागदपत्रे देऊन बँकेची 38 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | ऑटोमोबाईल्सच्या नावाने बनावट कागदपत्रे बनवून पुण्यातील बँकेला 38 लाखांचा गंडा (Cheating Fraud Case) घातला. हा प्रकार प्रेरणा को-ऑप. बँकेच्या धायरी शाखेत ऑक्टोबर 2021 ते 19 जानेवारी 2024 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी दोघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मेघनाथ सदाशिव बोडस (वय-61 रा. गणेश सोसायटी, शिवाजीनगर, पुणे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन शुभम एकनाथ दारवटकर (रा. नवदिप सोसायटी जवळ, मानाजीनगर), निखिल हनुमंत साळुंके (रा. प्रेक्षा विहार, एनडीए रोड, बावधन) यांच्यावर आयपीसी 420, 465, 467, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निखिल साळुंके याने स्काय मोटो अॅटोमोबाईल्स नावाने आयसीआयसीआय बँकेत बनावट ऑनलाईन खाते उघडून, प्रेरणा को-ऑप बँकेच्या धायरी शाखेकडून 16 लाख रुपये वाहन कर्ज घेतले. तर शुभम दारवटकर निखिल साळुंके याच्या मास्क ऑटोमोबाईल नावाने येस बँकेच्या अमनोरा टाऊन शाखेत बनावट ऑनलाईन खाते उघडून 22 लाख रुपये वाहन कर्ज घेतले.

वाहन कर्जाच्या रक्कमेतून वाहन घेणे आवश्यक असताना आरोपींनी वाहन खरेदी केले नाही. तसेच शोरुमचे बोगस बंक खाते, बनावट लेटर हेड, बनावट रबरी शिक्के, बनावट कोटेशन, बुकींग रिसीट अशी बानवट कागदपत्रे तयार करुन प्रेरणा बँकेच्या धायरी शाखेत सादर केली. या कागदपत्रांच्या आधारे वाहन कर्ज घेऊन बँकेची 38 लाखांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पोलिसांना पकडून दिल्याच्या रागातून महिलेचा खून, महिलेसह पतीला अटक; मावळ मधील घटना

Pune Police MPDA Action | हडपसर परिसरात दहशत माजवणारा सराईत गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध, पोलीस आयुक्तांची 89 वी कारवाई