Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलाकडून 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | एका सहा वर्ष वयाच्या मुलीवर तेरा वर्षाच्या मुलाने लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना पुण्यातील मोहम्मदवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुला विरुद्ध कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये (Pune Police) बलात्काराचा (Rape Case) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत पीडीत मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार 13 वर्षाच्या मुलावर आयपीसी 376, पोक्सो कलम 4,8,12 नुसार गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याच्या पालकांना नोटीस दिली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.11) दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपीच्या घरी घडला. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या शेजारी राहतो. शनिवारी दुपारी फिर्यादी यांची 6 वर्षाची मुलगी आरोपीसोबत खेळण्यासाठी त्याच्या घरी गेली होती होती. त्यावेळी अल्पवयीन मुलाने तिच्यासोबत गैरवर्तन केले.
हा प्रकार फिर्यादी यांच्या 5 वर्षाच्या मुलाने पाहिले. त्याने याबाबत घरी येऊन आईला सांगितले.
त्यानंतर पीडित मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तोरगल (API Torgal) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

बदनामी करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, 28 वर्षाच्या तरुणाला अटक; एरंडवणा येथील प्रकार

खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर वार, खडक परिसरातील घटना; तिघांना अटक

दुचाकीचा धक्का लागल्याच्या रागातून ब्लेडने वार, लोहियानगर मधील घटना