Pune Crime News | पुणे : प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. यातून मुलगी गरोदर (Pregnant) राहिली. तिचे दिवस भरल्यानंतर रुग्णालयात प्रसूती करण्यात आली. तिने मृत बाळाला जन्म दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Pune Police) तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार आंबेगाव येथील गायमुख स्मशानभुमी जवळ घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पीडित 18 वर्षीय मुलीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून विनोद धर्तीमगर (रा. शिवाजी चौक, आंबेगाव, ता. हवेली) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 366, 506 सह पोक्सो कलम 5/एल, 5/जे, 2, 6 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने मुलगी अल्पवयीन असताना तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला आंबेगाव येथील गायमुख स्मशानभूमी येथील झाडा झुडपात नेऊन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार 17 नोव्हेंबर 2019 ते 17 नोव्हेंबर 2023 या कालावधीत घडला. त्यामुळे मुलगी गर्भवती राहिली. (Pune Crime News)

तिच्या पोटात दुखत असल्याने तिच्या मामा व बहिणीने दोन दिवसांपूर्वी खेड शिवापूर येथील
रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासून तिची प्रसूती केली. तिला झालेली मुलगी मृत जन्माला आली.
यानंतर रुग्णालय प्रशासनाने याबाबत राजगड पोलीस ठाण्यात (Rajgad Police Station) माहिती दिली.
राजगड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तो भारती विद्यापीठ पोलिसांकडे वर्ग केला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील (API Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : बालदिनादिवशी 7 वर्षाच्या मुलीचा विनयभंग, आरोपी रिक्षाचालकाला अटक

FIR On NCP Activists | प्रा. नामदेव जाधवांच्या तोंडाला काळं फासणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल