Pune Crime News | पुण्यातील भाजपाचे माजी नगरसेवक उदय जोशी यांना ५ कोटींच्या फसवणूक प्रकरणात दिलासा, जामीन मंजूर

पुणे : Pune Crime News | पुण्यातील भाजपाचे (BJP) माजी नगरसेवक उदय जोशी (Former Corporator Uday Joshi) आणि त्यांचा मुलगा मयुरेश जोशीविरुद्ध दाखल गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay High Court) मोठा दिलासा मिळाला आहे. गुंतवणूकदारांची ५ कोटी ५३ लाख रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याप्रकरणी जोशी यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला होता. याबाबत ठेकेदार मंगेश खरे यांनी फिर्याद दिली होती. (Pune Crime News)

सिंहगड रोडवरील प्रसिद्ध श्रीराम गॅस एजेन्सीच्या (Shreeram Gas Agency) संबंधीत हे प्रकरण आहे. ही एजेन्सी जोशी कुटुंबियांच्या मालकीची आहे. जामीन मिळवण्यासाठी जोशी यांनी अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. यानंतर जोशी कुटुंबीयाने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली.

जोशी यांच्यावतीने ९ नोव्हेंबर २०२३ रोजी अ‍ॅडव्होकेट ऋषिकेश करवंदे व समीर वैद्य यांच्यामार्फत दाखल केलेला जामीन अर्ज उच्च न्यायालयाने मंजूर केला. ३० हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका आणि तितक्याच रकमेचा जामीनदार न्यायालयात जमा करण्याचे आदेश देत सशर्त जामीन मंजूर केला. (Pune Crime News)

गॅस एजन्सीत रक्कम गुंतविल्यास बँकेपेक्षा चांगला परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक प्रकरणी पुणे पोलिसांच्या
आर्थिक गुन्हे शाखेकडे जोशींविरोधात ९ जणांनी तक्रारी केल्या होत्या. परंतू हा गुन्हा जोशी कुटुंबीयांची प्रतिमा
मलिन करण्यासाठी करण्यात आला होता, असे जोशी कुटुंबाचे म्हटले आहे.

कोरोना महामारीच्या काळात जोशी यांचा गॅस एजन्सीचा व्यवसाय आर्थिक व तांत्रिक संकटात सापडला होता.
म्हणून जोशी यांनी काही जणांकडून हातउसने पैसे घेतले होते. त्यामध्ये काही सावकारांचा समावेश होता.
त्यामुळे काही सावकरांनी गॅस एजन्सी ताब्यात घेण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून चुकीच्या पद्धतीचे गुन्हे दाखल
केल्याची माहिती जोशी कुटुंबाने दिली.

उदय जोशी हे सदाशिव पेठेतून १९९७ ते २००२ दरम्यान भाजपचे नगरसेवक होते. महिला आरक्षणानंतर त्यांच्या पत्नी
शुभदा जोशी या नगरसेविका होत्या. त्यांची सिंहगड रोडवर श्रीराम गॅस एजेन्सी आहे. ही एजेन्सी २००१ पासून उदय
जोशी यांचा मुलगा मयुरेश सांभाळत होता. ही गॅस एजेन्सी भारतातील क्रमांक एक ची पारितोषिक विजेती एजेन्सी आहे,
अशी माहिती जोशी यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP – MNS | ‘…तर गुजरातीऐवजी मराठी पंतप्रधान करून दाखवा’, दिवाळी कार्यक्रमावरून भाजप-मनसेत जुंपली!

The Poona Merchants Chambers | खाद्यान्न एफएसएसएआय नविन व नुतणीकरण परवान्यांची मुदत पुन्हा पाच वर्षांसाठी; दि पूना मर्चंट्‌स चेंबरच्या पाठपुराव्याला यश