Pune Crime News | गुन्हे शाखेकडून वाहने चोरणार्‍याला अटक; दोन टेम्पो, स्विफ्ट कार हस्तगत

पुणे : Pune Crime News | दारुच्या व्यसनापायी टेम्पो, कार चोरणार्‍या सराईत गुन्हेगाराला (Criminal On Pune Police Records) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट ३ च्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरीचे दोन टेम्पो (Tempo) व स्विफ्ट कार (Swift Car) जप्त केले आहेत. (Pune Crime News)

अभिषेक शरद पवार Abhishek Sharad Pawar (वय ३५, रा. गुरुवार पेठ) असे या सराईताचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे अधिकारी व कर्मचारी दत्तवाडी परिसरात गस्त घालत असताना सहायक पोलीस फौजदार संतोष क्षीरसागर (ASI Santosh Kshirsagar) यांना पु. ल. देशपांडे उद्यानाजवळ एक जण टेम्पोच्या आसपास घुटमळताना दिसला. त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवून ताब्यात घेतले. (Pune Crime News)

त्याच्याकडे चौकशी केल्यावर तो टेम्पो त्याने काही दिवसांपूर्वी स्वारगेट (Swargate) परिसरातून चोरी करुन आणल्याचे कबुल केले. त्याने दारुच्या व्यसनासाठी स्वारगेट, हडपसर (Hadapsar), कात्रज (Katraj) या परिसरातून चोरुन या वाहनांचा उपयोग भाडे घेण्याकरीता करत होता. त्यातून मिळणार्‍या पैशांतून तो दारुचे व्यसन करीत असल्याचे सांगितले. (Arrest In Vehicle Theft)

त्याच्याकडून दोन टेम्पो व एक स्वीफ्ट कार जप्त केली आहे. त्याने ही वाहने हडपसर (Hadapsar Police Station), भारती विद्यापीठ (Bharti Vidhyapeeth Police Station), स्वारगेट पोलीस ठाण्याच्या (Swargate Police Station) हद्दीतून चोरली होती. (Pune Crime News)

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त सुनिल तांबे (ACP Sunil Tambe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट (Sr PI Shrihari Bahirat),
पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील (PSI Ajitkumar Patil),
पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार (PSI Rahul Pawar), पोलीस अंमलदार संतोष क्षीरसागर,
शरद वाकसे, सुजीत पवार, संजीव कळंबे, गणेश शिंदे, साईनाथक कारके, भाग्यश्री वाघमारे यांनी केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत