Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – तरुणीशी शारीरीक संबंध ठेवून गावाकडील मुलीसोबत फोडली सुपारी

पुणे : Pune Crime News | प्रेमसंबंध (Love Affair) निर्माण करुन लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर शारीरीक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. त्यानंतर गावाकडील मुलीसोबत सुपारी फोडून लग्नाची तारीख ठरविलेल्या तरुणावर चंदननगर पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी नवी मुंबईतील एका २६ वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७०/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सतिश ऊर्फ छत्रपती उद्धवराव शिंदे Satish alias Chhatrapati Uddhavarao Shinde (रा. मसला, जि. परभणी – Parbhani) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात प्रेमसंबंध होते.
सतिश याने लग्नाचे आमिष दाखवून खराडी बायपास येथील हॉटेलमध्ये नेऊन तिच्याबरोबर शारीरीक संबंध
प्रस्थापित केले. त्यानंतर फिर्यादी यांनी लग्नाबाबत विचारले असता शिवीगाळ करुन तिला मारहाण (Beating) केली.
मुळ गावाकडील मुलीसोबत सुपारी फोडून २२ मे २०२३ रोजीची लग्नाची तारीख निश्चित केली.
हे फिर्यादी यांना समजल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे
(API Ghorpade) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Pune Crime News : Chandannagar Police Station – Broke a betel nut with a girl from the village by having physical relationship with the young woman.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police Mega City |  महाराष्ट्र पोलीस मेगासिटी सह. गृहनिर्माण संस्थेचे काम रखडले, 7000 पोलीस कर्मचारी घराच्या प्रतिक्षेत (Video)

Dr. Nivedita Bhide | ‘गोष्टी, गोष्टी,पन्नास गोष्टी !’ पुस्तक संचाचे प्रकाशन – गोष्टींमुळे भाव जागरण व्हावे, दिशा मिळावी : डॉ. निवेदिता भिडे

CM Eknath Shinde | ‘झोळी लटकवून निघून जाशील…’, उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधानांवरील टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर, म्हणाले… (व्हिडिओ)

Vaikunth Smashan Bhoomi Pune | वैकुंठ स्मशानभूमी येथील वायू प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश