Pune Crime News | पुणे जि.प. सदस्य रेखा बांदल यांच्या कारची काच फोडून रोकड लंपास, पुणे नगर रस्त्यावरील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे जिल्हा परिषदेचे (Pune Zilla Parishad) आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल (Former Chairman Mangaldas Bandal) यांच्या पत्नी रेखा बांदल (Rekha Bandal) यांच्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी 40 हजार रुपये व इतर महत्त्वाची कागदपत्रे चोरुन नेले. हा प्रकार (Pune Crime News) बुधवारी (दि.6) सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान पुणे-नगर रस्त्यावरील (Pune-Nagar Road) अल्फा डायग्नोस्टिक (Alpha Diagnostic) समोर घडाला आहे. चोरट्यांनी पर्ससह 40 हजारांची रोकड, डेबिट कार्ड, आधार व पॅन कार्ड लंपास केले आहे.

या प्रकरणी रेखा मंगलदास बांदल (वय -42, रा. बांदल कॉम्प्लेक्स मागे, शिक्रापूर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा बांदल या सामाजिक कार्यकर्त्या (Social Worker) असून त्या तळेगाव ढमढेरे-रांजणगाव सांडस या जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्य (Zilla Parishad Member) आहेत. बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्या अमोल भोसले (Amol Bhosale) यांच्यासह खराडी येथील श्रीराम सोसायटीमध्ये मैत्री साम्राज्य ग्रुपने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाच्या (Dahihandi Festival) कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आलेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांची कार अल्फा डायग्नोस्टिक समोरील सार्वजनिक रोडवर पार्क केली होती.

दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यानंतर त्या कारजवळ आल्या. त्यावेळी त्यांना कराचा डाव्या बाजूची काच फुटलेली दिसून आली.
त्यांनी कारमध्ये पाहणी केली असता कारच्या मागील सीटवर ठेवलेले साहित्य गायब होते.
चोरट्यांनी गाडीची काच फोडून मागिल सीटवरील सर्व साहित्य चोरुन नेले.
यामध्ये पर्समध्ये ठेवलेली 40 हजार रुपयांची रोकड (Cash), पासपोर्ट (Passport), पॅन कार्ड (PAN Card),
आधार कार्ड (Aadhaar Card), दोन डेबिट कार्ड (Debit Cards) चोरट्यांनी चोरून नेले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप करपे (PSI Sandeep Karpe) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Accident News | पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू