Pune Accident News | पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Accident News | पुणे सोलापूर महामार्गावर (Pune Solapur Highway) आज (दि.07) पहाटे भीषण अपघात झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीतील हॉटेल मनाली (Hotel Manali) जवळ हा अपघात झाला असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. पहाटे पाचच्या वेळी दुचाकीस्वार पाठीमागून येणाऱ्या टेम्पोच्या खाली आल्यामुळे हा अपघात (Pune Accident News) झाला आहे. या अपघातामध्ये दुचाकीस्वार मुन्ना मोमीन शेख (Munna Shaikh) या युवकाचा जागीच मृत्य़ू झाला आहे तर आशिष रामदास जवरे (रा.शेवगाव, जि.अहमदनगर) हा युवक जखमी झाला आहे.

पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हलक्या झालेल्या पावसामुळे पुणे सोलापूर महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर एका दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
गाडीवरुन घसरून पडल्याने पाठीमागून येत असलेल्या अवजड वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
तर दुसऱ्या जखमी झालेल्या युवकाला तातडीने लोणी काळभोर वाहतूक पोलिसांच्या मदतीने ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
या अपघाताची खबर मिळताच कुजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे (Sachin Tupe), लोणी काळभोर वाहतूक शाखेचे
पोलीस अमलदार उमेश ढाकणे (Police Officer Umesh Dhakne), विजय काणेकर (Vijay Kanekar) व
लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे (Loni Kalbhor Police Station) बालाजी बागर (Balaji Bagar) यांनी घटनास्थळी
धाव घेतली. त्यांनी रुग्णवाहिकेस पाचारण करून जखमीला ससून रुग्णालयात पाठविण्यात आले.
यावेळी नेहमीप्रमाणे महामार्गावरील (Pune Accident News) अपघातांना मोलाची मदत करणारे कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे य़ांनी यावेळी देखील मदतीचा हात पुढे केला.

हे देखील वाचा

Pune Crime News | येरवडा: खंडणी देण्यास नकार दिल्याने हॉटेल व्यावसायिक महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन नेली हिसकावून; तिघा गुंडांनी केली हॉटेलमध्ये तोडफोड

National Nutrition Week 2023 | आजी-आजोबांच्या ताटात असावेत ‘हे’ ५ पोषकतत्‍व, एक्‍सपर्टकडून जाणून घ्या, कशी घ्यावी त्यांच्या न्‍यूट्र‍िशनची काळजी

Tax Return Process | करोडो टॅक्सपेयर्ससाठी मोठी अपडेट, CBDT ने दिली ही माहिती; ऐकून व्हाल खुश