Pune Crime News | कुंडमळा येथे वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला; मित्राचाही आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर शुक्रवारी तळेगाव दाभाडेजवळील इंदोरी गावच्या हद्दीतील कुंडमळा येथे पाण्याच्या प्रवाहात (Pune Crime News ) वाहून गेलेल्या ओंकार गायकवाड (Omkar Gaikwad) (वय 24, सध्या रा. चाकण, खेड, मूळ रा. पारनेर) या युवकाचा मृतदेह (Dead Body) शोधण्यात आपत्कालीन पथकाला (Emergency Squad) यश आले आहे. ओंकारसोबत असलेला त्याचा मित्र आदित्य गायकवाड (Aditya Gaikwad) याने वाहून गेलेल्या ओंकारचा शोध लागत नसल्यामुळे पाण्यात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न (Suicide Attempt) केला. मात्र, स्थानिक लोकांनी सावधपणे आदित्यला बाहेर काढत आदित्यचा जीव वाचवला.

याबाबत माहिती अशी की, ओंकार गायकवाड असे या वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी ओंकार मित्रांसोबत इंदोरी येथील कुंडमळा (Kundmala) येथे आला होता. संततधार पावसामुळे मावळातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. कुंडमळ्यातही पाण्याचा प्रचंड वेग आहे; मात्र, ओंकार या ओढ्यात उतरताच तो वाहून गेला. (Pune Crime News)

दरम्यान, तळेगाव दाभाडे पोलीस (Talegaon Dabhade Police) लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र (Shivdurg Mitra),
वन्यजीव रक्षक संघटना (Wildlife Protection Association) आणि ‘आपदा मित्र, मावळ’च्या (‘Aapda Mitra, Maval’)
आपत्कालीन पथकांचे सदस्य ओंकारचा शोध घेत होते. शेवटी रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ओंकारचा मृतदेह शोधण्यात शिवदुर्ग,
वन्यजीव रक्षक मावळ व ‘आपदा मित्र’ या संघटनांना यश आले आहे.

Web Title :  Pune Crime News | pune maval kundmala body of a young man who was flown away in was found

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आजचा पुण्यातील दर काय? जाणून घ्या

Weekly Horoscope (10-16 July) : हा आठवडा सर्वांसाठी कसा असेल, वाचा १२ राशींचे साप्ताहिक राशिफळ

Depression | ‘या’ बियांच्या सेवनाने दूर होईल तुमचे ‘डिप्रेशन’, जाणून घ्या त्याचे फायदे