Pune Crime News | तोतया IAS Officer पोलिसांच्या जाळ्यात; पंतप्रधान कार्यालयात (PMO) सेक्रेटरी असल्याचे सांगून फसवणूक

बॉर्डर लेस वर्ल्ड फाऊंडेशनच्या कार्यक्रमात होता सहभागी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पंतप्रधान कार्यालयात सेक्रेटरी (Secretary In PMO) असल्याचे सांगून गोपनीय काम करीत असल्याचे सांगणारा पोलिसांच्या चौकशीत तोतया निघाला. गेल्या चार पाच वर्षांपासून तो आयएएस अधिकारी (IAS Officer) असल्याचे सांगून पंतप्रधान कार्यालयात (Prime Minister’s Office) दिल्लीला कामाला असल्याचे सांगत फिरत होता. (Pune Crime News)

 

वासुदेव निवृत्ती तायडे Vasudev Nivrutti Taide (वय ५४, रा. रानवारा रो हाऊस, तळेगाव दाभाडे – Talegaon Dabhade) असे त्याचे खरे नाव आहे. गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट १ ने त्याला अटक केली आहे.

 

याबाबतची माहिती अशी, बॉर्डर लेस वर्ल्ड फाऊंडेशन (Borderless World Foundation) या संस्थेचा औंध येथे २९ मे रोजी सकाळी कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये जम्मू काश्मीर येथे मदतीसाठी अ‍ॅम्बुलन्स पाठविण्याचा लोकार्पण सोहळा होता. या कार्यक्रमाला विरेन शहा, सुहास कदम, पी के गुप्त व इतर ट्रस्टी व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये पाहुणे म्हणून आलेली एका व्यक्तीने आपले नव डॉ. विनय देव असे सांगितले. ते स्वत: आय ए एस या पदावर असून सध्या त्यांची ड्युटी सेक्रेटरी या पदावर पंतप्रधान कार्यालय, दिल्ली येथे आहे. ते गोपनीय काम करीत असतात, असे सांगितले. या बाबत संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांच्याकडे अधिक विचारणा केली असता त्यांच्या आय ए एस पदाबाबत संशय आला. (Pune Crime News)

या पदाधिकार्‍यांनी आपला संशय गुन्हे शाखेकडे बोलून दाखविला. पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन तळेगाव दाभाडे येथील घरातून ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्याने आपले खरे नाव वासुदेव तायडे असल्याचे कबुल केले.

 

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार (ACP Sunil Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ चे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद (Sr. PI Shabbir Sayyed), सहायक पोलीस निरीक्षक कवठेकर (API Kawthekar),
पोलीस अंमलदार राहुल मखरे, इम्रान शेख, अभिनव लडकत व निलेश साबळे यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title :  Pune Crime News | Pune Police Crime Branch Arrest Fake IAS Officer;
Fraud by pretending to be a secretary in the Prime Minister’s Office (PMO)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा