Pune Crime News | ‘हाफ मर्डर’च्या गुन्ह्यातील आरोपींचं लपुन बिबवेवाडी ओटा परिसरात वास्तव्य; गुन्हे शाखेने आरोपी महिलेसह आवळल्या दोघांच्या मुसक्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | खुनाच्या प्रयत्नाच्या (Attempt To Kill) गुन्ह्यात फरार झाल्यानंतर ओळख लपवुन बिबवेवाडी ओटा (Bibwewadi Ota) परिसरात वास्तव्य करणार्‍या दोघांना पुणे शहर पोलिसांच्या (Pune City Police) गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक-1 ने (Anti Extortion Cell (AEC) Pune) अटक केली आहे. त्यांना अधिक तपासासाठी खडकी पोलिस स्टेशनच्या (Khadki Police Station) ताब्यात देण्यात आले आहे. (Pune Crime News)

 

सैय्यद नुर जानशा इराणी (54) आणि रूक्साना सैय्यद नुर इराणी (51, दोघे , रा. पाटकर प्लॉट नं. 8, महात्मा गांधी वसाहत, ईराणी गल्ली, मुंबई-पुणे रोड – Mumbai Pune Road, शिवाजीनगर, पुणे Shivaji Nagar Pune) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, खंडणी विरोधी पथकाला (AEC Pune) खडकी पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी हे बिबवेवाडी ओटा परिसरात लपवुन वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर सापळा रचुन त्यांना अटक करण्यात आली आहे. (Pune Crime News)

अटक आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी साथीदारांच्या मदतीने खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा केल्याचे मान्य केले. आरोपींना खडकी पोलिस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik), गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय वाघमारे (Sr PI Ajay Waghmare) यांच्या सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत पाटील (API Abhijeet Patil) , सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रविण ढमाळ, पोलिस अंमलदार संजय भापकर, पोलिस रविंद्र फुलपगारे, पोलिस नितीन कांबळे, पोलिस राजेंद्र लांडगे, पोलिस प्रफुल्ल चव्हाण आणि महिला पोलिस अंमलदार ज्योती मुलका यांनी केली आहे.

 

Web Title :  Pune Crime News | Pune Police Crime Branch Arrest Two In Attempt To Murder Kill Case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा