Pune Crime News | पुण्यातील कोंढव्यात IPL वर सट्टा घेणारे मोठे बुकी गुन्हे शाखेच्या जाळ्यात ! 9 जणांना अटक, 1 कॉम्प्युटर, 3 लॅपटॉप, 18 मोबाईल हॅन्डसेट जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (नितीन पाटील) – Pune Crime News | पुण्यातील कोंढव्यामधील (Kondhwa) आयपीएलच्या मॅचेसवर मोठ्या प्रमाणावर सट्टा घेणार्‍या बुकींवर (Cricket Betting On IPL) पुणे शहर पोलिसांच्या (Pune City Police) गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. त्यामध्ये तब्बल 9 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 1 कॉम्पयुटर, 3 लॅपटॉप, 18 मोबाईल हॅन्डसेट, 92 हजार रूपये रोख असा एकुण 5 लाख 12 हजार रूपयाचा ऐवज जप्त केला आहे. एकाचवेळी सट्टा घेणार्‍या 9 जणांना अटक झाल्याने क्रिकेट बेटिंगच्या बाजारात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar), सह आयुक्त संदिप कर्णिक (Jt CP Sandeep Karnik), अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar) आणि युनिट-3 चे वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट (Sr PI Shrihari Bahirat) यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. (Pune Crime News)

हेमंत रविंद्र गांधी Hemant Ravindra Gandhi (वय 38, रा 313, रास्ता पेठ, पुणे), अजिंक्य शामराव कोळेकर Ajinkya Shamrao Kolekar (वय 30, रा. 207, नाना पेठ, पुणे), सचिन सतीश घोडके Sachin Satish Ghodke (वय 35, रा. 36/37, रास्ता पेठ, गोखले वाडा, मदाशी गणपती जवळ), यशप्रताप मनोजकुमार सिंह Yash Pratap Manojkumar Singh (वय 22, रा. मु. पो. मानकढिया, ता. मिर्जामुराद, जि. वाराणसी, राज्य उत्तरप्रदेश), धर्मेंद्र संगमलाल यादव Dharmendra Sangmlal Yadav (वय 25, रा. मु. कुकडी, पो. कोंधीयारा, ता. करचना, जि. प्रयागराज, राज्य उत्तरप्रदेश), रींगलं चंद्रशेखर पटेल Reingalm Chandrasekhar Patel (वय 22, रा. मोगलावीर, ता. मिर्जामुराद जि. वाराणसी, राज्य उत्तरप्रदेश), अनुराग फुलचंद यादव Anurag Fulchand Yadav (वय 32, रा. मु. पो. मुंगारी, ता. कचना, जि. प्रयागराज, राज्य उत्तरप्रदेश),

 

इंद्रजित गोपाल मुजुमदार Indrajit Gopal Mujumdar (वय 30, रा. मु. पो. पश्चिम पंछीबेरिया, ता. गंगानदपूर, जि. उत्तर 24 परगाणा, राज्य पश्चिम बंगाल) आणि सतीश संतोष यादव Satish Santosh Yadav (वय 18, रा. मु. पो. पोहदार, ता. नेजा, जि. प्रयागराज, राज्य उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी कोंढव्यातील ब्रम्हा आंगण बी/2, फ्लॅट नं. 6 येथे काही बुकी आयपीएलच्या मुंबई इंडियन्स विरूध्द चेन्नई सुपर किंग या क्रिकेट मॅचवर मोठ्या प्रमाणावर सट्टा घेत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार आणि युनिट-3 चे वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शखाली एसीपी सुनिल पवार, व.पो.नि. बहिरट, पोलिस उपनिरीक्षक पवार, पीएसआय पाटील आणि इतर कर्मचार्‍यांनी शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कोंढव्यात छापा टाकला. त्यावेळी तेथे 9 जण आयपीएलच्या मॅचवर बेटिंग घेत असल्याचे आढळून आले. (Pune Police Crime Branch Bust IPL Cricket Betting Racket In Kondhwa)

अटक आरोपींपैकी काहीजण हे LOTUS 365 या लिंकवर ID तयार करून खेळणार्‍या ग्राहकांना देत असल्याचे निदर्शनास आले. आरोपी हेमंत गांधी हा क्रिकेट लाईव्ह अ‍ॅपवर आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेत होता. त्याच्या खिशात 92 हजार रूपये मिळून आले. त्याच्याजवळ 1 लॅपटॉप, 5 मोबाईल हॅन्डसेट आढळले इतर जण हे LOTUS 365 चे ID तयार करून ग्राहकांना देण्याचे काम करत होते. त्यांच्याकडे 2 लॅपटॉप, 1 कॉम्प्युटर आणि 13 मोबाईल हॅन्डसेट होते. पोलिसांनी एकुण 5 लाख 12 हजार रूपये किंमतीचा 1 कॉम्प्युटर, 3 लॅपटॉप, 18 मोबाईल असा एकुण मिळून आला. आरोपींविरूध्द कोंढवा पोलिस ठाण्यात (Kondhwa Police Station) मुंबई जुगार का. क. 4, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

 

दरम्यान, पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सट्टेबाजीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्याने सट्टा बाजारात प्रचंड खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पुणे शहरात मोठ्या प्रमाणात आयपीएल मॅचेसवर सट्टा घेतला जात असल्याची चर्चा आहे.
काही जण गायब होवून मोठं कामकाज करत असल्याचे देखील बोलले जाते. ‘गोट्या’ आणि ‘राहुल’ नावाचे मोठे बुकी हे खुपच मोठं कामकाज करीत असल्याची चर्चा पुण्यात आहे.
पुणे शहरातील काही बारमध्ये रात्री दारू पिताना खुलेआम आयपीएल मॅचवर सट्टा लावला जात असल्याचे देखील पहावयास मिळते.
सट्टा खेळण्यासाठी वेगवेगळ्या अ‍ॅपचा (Cricket Betting App) मोठ्या प्रमाणावर वापर होते आहे.

शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने आयपीएलच्या क्रिकेट मॅचवर सट्टा घेणार्‍या 9 जणांना अटक करून 18 मोबाईल,
3 लॅपटॉप आणि इतर चिठ्ठ्या आणि कागदे जप्त केल्यामुळे सट्टा बाजाराची तार कुठपर्यंत आहे हे आता समोर येण्याची शक्यता आहे.
काही मोठे बुकी मात्र गायब होवुन मोठं कामकाज करत असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईमुळे पुणे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

Web Title :  Pune Crime News | Pune Police Crime Branch Bust IPL Cricket Betting Racket In Kondhwa,
9 persons arrested, 1 computer, 3 laptops, 18 mobile handsets seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा