NCP Chief Sharad Pawar | ‘मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता वापरावी, मात्र…’, शरद पवारांची राज्य सरकारवर टीकास्त्र

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यकर्त्यांच्या मनात फक्त एकच आहे. कधी रामाच्या नावाने, कधी आणखी कुणाच्या नावाने, कधी अयोध्येच्या नावाने राजकारण (Maharashtra Politics News) केले जात आहे. मात्र जनतेच्या मूळ प्रश्न वगळून, धर्म, जात यावर अधारित एक वेगळं सामाजिक चित्र निर्माण करणं आणि कष्टकऱ्यांचे मूलभूत प्रश्न यापासून कसा बाजूला जाईल, याची काळजी घेतली जात असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP chief Sharad Pawar) केली. नाशिक येथे हिंद मजदूर सभा (Hind Mazdoor Sabha) या राष्ट्रीय कामगार संघटनेला (National Trade Union) 75 वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात शरद पवार (NCP chief Sharad Pawar) बोलत होते.

 

शरद पवार (NCP chief Sharad Pawar) पुढे म्हणाले, देशात आज महागाई (Inflation), बेरोजगारी (Unemployment), नोकरी (Jobs) यांचा प्रश्न गंभीर आहे. या प्रश्नांसाठी सत्ता वापरीली पाहिजे, याची अपेक्षा राज्यकर्त्यांकडून आहे. मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता वापरावी, मात्र यासाठी राज्यकर्त्यांकडे वेळ नाही, असेही ते म्हणाले.

 

एक काळ असा होता की, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये कष्टकरी लोकांची संख्या होती. तसेच एकेकाळी मुंबई शहर देशाची औद्योगिक राजधानी (Industrial Capital) होती. परंतु आज मुंबईचा उल्लेख औद्योगिक नगरी म्हणून करत नाही. मुंबई शहरात 110-115 टेक्सटाइल मिल (Textile Mill) होत्या. गिरणगावात सकाळचा भोंगा झाला की आमचा कष्टकरी बांधव कामाला जायचा. दुपारची सुट्टी झाली की पुन्हा घरी जायचा.
त्यावेळी कष्टकरी बांधवांची चाळ दिसत होती. मात्र आज ही चाळ, खोली दिसत नाही.
आज उंचच उंच इमारती दिसत आहेत मात्र त्यात कष्टकरी राहत नसल्याची खंत शरद पवार यांनी बोलून दाखवली.

 

आज अनेक ठिकाणी सरकारी कामे बंद होत आहेत.
तुम्ही तुमचे काही प्रश्न सोडवून घेण्यासाठी यशस्वी झालात.
या संघनेने सातव्या वेतन आयोगाचा (7th Pay Commission) प्रश्न सोडवण्यासाठी खबरदारी घेतली.
आपली एकी अभेद्य ठेवली पाहिजे. आपली शक्ती मजबूत केली पाहिजे.
कारण आज धर्म आणि जाती यांच्यात फूट पडत आहे, असल्याचे शरद पवार म्हणाले.

Web Title :- NCP Chief Sharad Pawar | Sharad Pawar’s criticism of the state government, ‘Power should be used to solve basic problems, but…’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

ACB Demand Case On Traffic Police | 14 हजाराच्या लाच प्रकरणी 2 वाहतूक पोलिस अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘रडार’वर

Pune PMC – Uruli Devachi – Fursungi | गावे वगळून स्वतंत्र नगरपालिका किंवा महापालिका निर्माण करण्याची मागणी ‘राजकियच’ !

Railway Protection Force (RPF) | वर्षभरात आरपीएफनं दिलं 86 लोकांना जीवदान, रेल्वे अपघातातून वाचवलं