Pune Crime News | पुणे पोलिसांनी नष्ट केले 4 कोटींचे 761 किलो अंमली पदार्थ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे पोलिसांनी (Pune Police) विविध कारवायांमध्ये जप्त केलेल्या अंमली पदार्थांची (Drugs) होळी करण्यात आली. यावेळी पुणे पोलिसांनी जप्त केलेला 761 किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आला. नष्ट करण्यात आलेल्या अंमलीपदार्थाची बाजारभावानुसार 4 कोटी 10 लाख 6 हजार रुपये किंमत आहे. या अंमली पदार्थाच्या साठ्याची रांजणगाव येथील एमईपीएल कंपनीच्या (MEPL Company Ranjangaon) भट्टीत विल्हेवाट लावण्यात आली. यामध्ये गांजा (Marijuana), कोकीन (Cocaine), मेफेड्रोन (Mephedrone), चरस (Charas), हिरोइन (Heroin) अशा ड्रग्जचा समावेश होता. 16 पोलिस स्टेशनच्या हद्दीत कारवाई करून या अंमली पदार्थाचा साठा (Pune Crime News) जप्त करण्यात आला होता.

 

पुणे शहर आणि परिसरात कारवाई करत पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक 1 आणि 2 यांनी 2022 या वर्षात 761 किलो 575 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ जप्त केला होता. जप्त केल्या अंमली पदार्थाचा पुनर्वापर होऊ नये साठी हे पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत. अंमली पदार्थ नष्ट करुन त्याची कशा प्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे यासंदर्भातील सूचना केंद्र सरकारच्या अर्थ आणि महसूल विभागाने केलेल्या आहेत. (Pune Crime News)

अंमली पदार्थ नष्ट करण्यासाठी राज्य सरकारच्या (State Government) गृह विभाग Home Department (विशेष) यांनी अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे. तसेच गुन्हे अन्वेषन विभागाचे महासंचालक यांनी देखील परिपत्रक काढून सूचना दिलेल्या आहेत. त्या सर्व सूचनांचा आधार घेत पुणे पोलिस आयुक्तालयाच्या (Pune Police Commissionerate) हद्दीत कारवाई करून जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचा साठा रांजणगाव येथील कंपनीच्या भट्टीत नष्ठ करण्यात आला.

 

पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ (Maharashtra Pollution Control Corporation), राज्य उत्पादन शुल्क विभागातील (State Excise Department) अधिकारी, रासायनिक प्रयोगशाळेतील अधिकारी उपस्थित होते.

 

गांजाचा अधिक समावेश
पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकांनी जप्त केलेल्या अंमली पदार्थामध्ये सर्वाधिक गांजाचा समावेश आहे.
तस्करांकडून कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश राज्यांमधून गांजाची पुण्यात तस्करी केली जाते.
यावरुन पुणे, मुंबई आणि इतर शहरात तस्करांची साखळी कार्यरत असल्याचे उघडकीस आले आहे.
सार्वजनिक वाहतुकीतून अवैधरित्या अंमली पदार्थांची तस्करी करण्यात येते.
यापुढील काळातही अंमली पदार्थांची तस्करी करणार्‍यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले.

 

Web Title :- Pune Crime News | Pune police destroyed 761 kg of narcotics worth 4 crores

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | शनिवारी परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत होणार महारोजगार मेळावा, विवाह संस्कार मेळावा

Chinchwad Bypoll Election | ‘मला चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत यश पाहिजे’; अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना ठणकावले

Aurangabad Crime | बापाच्या दारू पिण्याच्या सवयीला वैतागून पोटच्या मुलांनीच केली बापाची हत्या