Pune Crime News | पुणे : केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची 13 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | केवायसी अपडेट (KYC Update) करण्याच्या बहाण्याने ठगांनी कोथरुडमधील 54 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून 12 लाख 80 हजार रुपये काढल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाण्यात (Pune Cyber Police Station) सायबर चोरट्याविरुद्ध (Cyber Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2023 मध्ये ज्येष्ठ नागरिकाच्या कोथरुड येथील राहत्या घरी ऑनलाइन पद्धतीने घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत संजय राजाराम कुलकर्णी (वय-54 रा. पौड रोड, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) सोमवारी (दि.27) फिर्यादी आहे. यावरुन 82929XXXXX, 82938XXXXX मोबाईल धारकांवर आयपीसी 419, 420 सह आयटी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोबाईल धारकांनी फिर्य़ादी यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून
अ‍ॅक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. आरोपींनी फिर्यादी यांना त्यांचे केवायसी अपडेट करायचे असल्याचे
सांगून त्यांचा आधार कार्ड, पॅन कार्ड, डेबिट कार्डची माहिती घेतली. तसेच फिर्यादी यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी घेतला.
आरोपींनी फिर्यादी यांच्या नावावर कर्ज मंजुर करुन घेतले. कर्जाची रक्कम फिर्यादी यांच्या अ‍ॅक्सिस बँकेच्या खात्यात
जमा झाल्यानंतर सायबर चोरट्यांनी कर्जाची रक्कम परस्पर बँक खात्यातून ट्रान्सफर करुन घेतली. सायबर गुन्हेगारांनी फिर्यादी यांची 12 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. सायबर पोलिसांनी हा गुन्हा कोथरुड पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Sr PI Hemant Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | विवाहितेचा विनयभंग करुन पळवून नेण्याची धमकी, शिवाजीनगर परिसरातील घटना

Adv Pramod Bombatkar | अ‍ॅड. प्रमोद बोंबटकर यांच्याकडे ‘जिल्हा सरकारी वकील (DGP) पदाचा अतिरिक्त पदभार

Pune Drug Case | ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील ‘उद्योगी’ कर्मचार्‍याला अटक; ससूनमधील भानगडी समोर येणार?