Pune Crime News | पुणे : मुलीला भेटायचे म्हणत घरात घुसण्याचा प्रयत्न, महिलेचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | तरुणीचा पाठलाग करुन तिच्या घराचा पत्ता शोधला. त्यानंतर मुलीला भेटायचे आहे म्हणत जबरदस्तीने घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध केला असता त्याने महिलेसोबत गैरवर्तन करुन विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना मांजरी ब्रु. येथे घडली आहे. हा प्रकार रविवारी (दि.5) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी तरुणाला पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. (Pune Crime News)

याबाबत 43 वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दर्शन दशरथ शिळीमकर Darshan Dashrath Shilimkar (वय-23 रा. बोरवली) याच्यावर आयपीसी 354, 354ड, 452, 323, 324, 504 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दर्शन याने फिर्यादी यांच्या मुलीला भेटण्यासाठी तिचा पाठलाग करुन घराचा
पत्ता शोधला. त्यानंतर रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास तो घरी आला. त्याने फिर्य़ादी यांना मला घरात जाऊ द्या,
मला मुलीला भेटायचे आहे, असे म्हणत घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला
विरोध केला असता त्याने फिर्यादी यांच्यासोबत गैरवर्तन केले. तसेच त्यांना हाताने मारहाण (Beating) केली.
तसेच आरोपीने फिर्यादी यांच्या लहान मुलाच्या हाताचा चावा घेतला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : शारीरिक संबंधाबाबत घरच्यांना सांगण्याची धमकी, वीस लाखांची खंडणी मागणाऱ्या महिलेवर FIR

Pune Crime News | 55 वर्षाच्या व्यक्तीकडून 10 वर्षाच्या मुलीचा विनयभंग, सिंहगड रोड परिसरातील घटना

Supreme Court | २०२४ च्या निवडणुकीआधी महिला आरक्षण लागू करणे आमच्यासाठी खूप कठीण; सुप्रीम कोर्टाने सांगितले कारण