Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : वानवडी पोलिसांकडून खासगी प्रवासी बसमधील महिलांचा ऐवज चोरणार्‍या गंगाखेडच्या ( जि. परभणी) दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | खासगी प्रवासी बसमधील प्रवासी महिलांकडील ऐवज चोरणार्‍यांना वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police) परभणी (Parbhani) जिल्हयातील गंगाखेड (Gangakhed) येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, 6 मोबाईल हॅन्डसेट असा एकुण 3 लाख 76 हजार रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे. (Pune Crime News)

 

शिवा राजु शिंदे (30, मुळ रा. चिखलठाणा, छत्रपती संभाजीनगर) आणि के तेजा के सागर उर्फ गोपी उर्फ सुर्या शिंदे (20, मुळ रा. चिखलठाणा, छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. दि. 2 एप्रिल रोजी फिर्यादी महिला लातूर ते पुणे (Latur To Pune) खासगी बसने प्रवास करत होत्या. पहाटेच्या सुमारास त्या वानवडी परिसरातील क्रोम मॉलसमोर उतरल्या. त्यांनी बॅग तपासली असता त्यामधील 10 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने कोणीतरी लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक विश्लेषण करून आरोपींना परभणी जिल्हयातील गंगाखेड येथून अटक केली. त्यांच्याकडून 86 ग्रॅम वजनाचे 3 लाख 64 हजार रूप्ये किंमतीचे सोन्याचे दागिने तसेच 6 मोबाईल हॅन्डसेट आणि सोने मोजण्यासाठीचा छोटा डिजीटल मिनी पॉकेट वजनकाटा व इतर कागदपत्रे असा एकुण 3 लाख 76 हजार रूपयाचा ऐवज जप्त केला. (Pune Crime News)

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार,
पोलिस उपायुक्त विक्रांत पाटील, सहाय्यक आयुक्त पोर्णिमा तावरे
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे,
पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदीप शिवले, पोलिस उपनिरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक अजय भोसले, पोलिस अंमलदार विनोद भंडलकर,
अतुल गायकवाड, अमजद पठाण, संतोष नाईक, महेश गाढवे, संदिप साळवे, विष्णु सुतार, राहुल गोसावी, निलकंठ राठोड,
अमोल गायकवाड, विठ्ठल चोरमले आणि सोनम भगत यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :-  Pune Crime News | Pune Wanwadi police arrested two men from Gangakhed (Dist. Parbhani) who were stealing money from women in a private passenger bus crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | नागपूरमधील मविआच्या ‘वज्रमूठ’ सभेत अजित पवार भाषण करणार नाहीत, स्वत:च केला खुलासा; राजकीय चर्चांना उधाण

Chandrakant Patil | मुलींच्या शिक्षण, सक्षमीकरणावर शासनाचा भर – मंत्री चंद्रकांत पाटील

BARTI Pune | बार्टी संस्थेच्यावतीने विविध उपक्रमांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी