Pune Crime News | करार करुनही फ्लॅट खरेदी करुन देण्यास नकार देऊन वीज मीटर नेले कापून; मुंढव्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | समजूतीचा करार करुन फ्लॅटचा ताबा दिला. परंतु, खरेदी करुन नेण्यास नकार देऊन फ्लॅट खाली करावा, यासाठी धमक्या देऊन वीज मीटर बंद करुन फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याप्रकरणी एका ३१ वर्षाच्या महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९१/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोहम्मद अबान अली (रा. केशवनगर, मुंढवा), इस्माईल व नयना अशा तिघांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार केशवनगरमधील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये २१ एप्रिल ते १५ ऑगस्ट २०२२ तसेच १५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद अबान आली याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन गॅलेक्सी अपार्टमेंटमधील २ फ्लॅटसाठी त्यांच्याकडून बुकींग रक्कम म्हणून ५ लाख रुपये घेऊन समजूतीचा करारनामा केला़ फ्लॅटची मालकी हक्क फिर्यादी यांना दिला आहे. परंतु, फिर्यादी यांनी अली यांना कराराप्रमाणे फ्लॅटची खरेदी करुन देण्यास नकार दिला़ फ्लॅट खाली करण्याचे सांगून धमक्या दिल्या. वीज मीटर बंद करुन त्यांना मानसिक त्रास देऊन फसवणूक केली. (Pune Crime News)

 

फिर्यादी यांची भावजयी इमारतीच्या पार्किंगमध्ये असताना ते वीज मीटर काढून घेत होते.
त्यावेळी तिने मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला. मोहम्मद अली याने तिच्या अंगावर येऊन मोबाईल फोन हिसकावून घेतला.
तिला ‘‘ए पागल औरत अब क्या करेंगी तू़ तू तो मेरे हात मे है, अब कहां आयेगी’’
असे म्हणून त्यांच्या अंगाला स्पर्श करुन लज्जास्पद वर्तन केले.
पार्किंगमध्ये असलेल्या इस्माईल व नयना यांनी धमकावून शिवीगाळ केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक शिवाजी काटे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Refusal to buy the flat even after signing the contract, cut the electricity meter; Incidents in Mundwa

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MNS Sandeep Deshpande | मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये हल्ला; रॉड आणि स्टम्पने केली मारहाण

Aurangabad ACB Trap | पेन्शन मंजूर करुन आणण्यासाठी लाचेची मागणी, कृषी अधिकारी कार्यालयातील लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची 14.50 कोटींची फसवणूक, पाषाण परिसरातील प्रकार