Pune Crime News | पोलीस असल्याची बतावणी करुन पती-पत्नीला लुबाडले; परदेशी चलन घेऊन चोरटे पसार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | परदेशातून आलेल्या लोकांना हेरुन त्यांच्याशी अरेबी भाषेत बोलून पोलीस असल्याची बतावणी करुन त्यांच्याकडील वस्तूंची तपासणी करण्याचा बहाणा करुन त्यांना लुटण्याची आणखी एक घटना समोर आली आहे. (Pune Crime News)

याबाबत सालेह ओथमान एहमद (वय ५२, रा. हिला मंजील, मिठानगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (ग. रजि. नं. १४६/२४) दिली आहे. ही घटना कोंढवा खुर्द येथील आशिर्वाद चौकात ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या पत्नीसह कोंढव्यातील आशिर्वाद चौक परिसरात पायी फिरत होते.
त्यावेळी एका कारमधून काही जण आले़ गाडीत बसलेल्या चालकाने अरबी भाषेत त्यांच्याशी बोलून पोलिस
असल्याची बतावणी केली. फिर्यादी यांच्याकडे असणार्‍या वस्तूंची, ओळखपत्रांची पडताळणी करायची आहे, असे सांगितले.
स्वत:चे ओळखपत्र दाखविल्यासारखे भासविले. फिर्यादी हे खिशातील कागदपत्रे, पैसे दाखवत असताना कागदपत्रांचा व पैशांचा नाकाने वास घेऊन तपासत असल्याचे भासविले. त्यांना काही समजायच्या आत त्यांच्याकडील ५३ हजार रुपये, १ लाख ७७ हजार १२० सौदी रियाल चलन, २ लाख ४९ हजार अमेरिकन डॉलर असे एकूण ४ लाख ७९ हजार १२० रुपये घेऊन चोरटे पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील तपास करीत आहेत.

परदेशातून आलेल्या नागरिकांना हेरुन पोलीस असल्याची बतावणी करुन त्यांची तपासणी करण्याचा बहाणा करुन
लुटण्याचा प्रकार यापूर्वी कोंढवा परिसरात घडले आहेत़ ही टोळी पुन्हा कार्यरत झाल्याचे या प्रकारावरुन दिसून येत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Indrani Balan Foundation | ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ व ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’मध्ये सामंजस्य करार ! शालेय सुविधांसाठी ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ची 3 कोटींची मदत

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | गणेशजयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम’ ! ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून आयोजन’

Nashik Crime News | किरकोळ वादातून लोखंडी रॉडने हल्ला करुन रिक्षाचालकाचा खून

पिंपरी : खोटी बिले देऊन कंपनीला 24 लाखांचा गंडा, दोन कर्मचाऱ्यांवर FIR

Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’कडून ‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या विद्यार्थ्यांना 31 संगणकांची भेट

Pune Lonikand Crime | भावजयीचा भावाच्या मदतीने खून करणार्‍यास लोणीकंद पोलिसांकडून अटक

Muder In Budhwar Peth Pune | बुधवार पेठेतील श्रीनाथ टॉकीजजवळ महिलेचा खून

Pune Mundhwa Police | ‘इमानदार’ रिक्षा चालकाने पोलिस ठाण्यात जमा केला 1 लाख 10 हजाराचा ऐवज; मुंढवा पोलिसांकडून रिक्षा चालकाचे कौतुक अन् सत्कार