Pune Crime News | Sahakar Nagar Police Station : सहकारनगर पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक (Cheating) करणार्‍या टोळीतील तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police Station) ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक (Cheating Case) करणार्‍या तिघांना अटक केली आहे (Three Arrested In Cheating Case Of Senior Citizen). चारचाकी वाहन तारण अथवा विक्री करण्याचा बहाणा करून पैसे घेवुन तेच वाहन दुसर्‍या चावीने परस्पर घेवुन संबंधितांची फसवणूक केल्याचे 3 गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. (Pune Crime News)

 

हर्षद कुंडलीक पवार Harshad Kundlik Pawar (24, रा. मु.पो. दोनवडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर), फैयाज अली मोकाशी Fiyaz Ali Mokashi (37, रा. मु.पो. येळापुर, सैय्यदवाडी, ता. शिराळा, जि. सांगली. सध्या रा. पुणसगी, ता. कालेकोट, जि. सुरपुर, बेंगलोर, कर्नाटक) आणि युवराज बाळासो पाटील Yuvraj Balasaheb Patil (38, रा. सेक्टर नं. 19, अनिरूध्द हाईट्स, नेरूळ, नवी मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime News)

 

आरोपींनी आपली 2 लाख रूपयांची फसवणूक (Fraud Case) केली म्हणून कात्रज परिसरातील दत्तनगरमधील (Datta Nagar Katraj) एका ज्येष्ठ नागरिकानी सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल करून सहकारनगर पोलिसांनी सखोल तपास करून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी अशा प्रकारचे एकुण 3 गुन्हे केल्याचे मान्य केले आहे. अशाच पध्दतीने पुण्यातील स्वारगेट परिसरातील (Swargate Police Station) एका आणि नवी मुंबईतील धनसोली (Ghansoli Police Station) परिसरातील एकाला त्यांनी गंडा घातला असल्याची माहिती समोर आली आहे.

अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil), पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS IPS Smartana Patil) ,
सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगांवकर (Sr PI Sawalaram Salgaonkar), पोलिस निरीक्षक (गुन्हे) मनोज शेडगे (Police Inspector Manoj Shedge)
यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर शेंडे (API Sameer Shende), पोलिस अंमलदार बापु खुटवड,
पोलिस सुशांत फरांदे, पोलिस बजरंग पवार, पोलिस महेश मंडलिक, पोलिस नवनाथ शिंदे, पोलिस सागर सुतकर,
पोलिसा सागर कुंभार, पोलिस विशाल वाघ आणि पोलिस खंडू शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title :  Pune Crime News | Sahakar Nagar Police Station: Sahakar Nagar Police arrested three people from the gang of cheating senior citizens

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा