Pune Crime News | कोयत्याने दहशत निर्माण करणार्‍या नाना पेठ आणि रविवार पेठेतील 5 जणांना अटक; समर्थ पोलिसांची कामगिरी

पुणे : पोलीनासनामा ऑनलाइन – Pune Crime News | समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवावाडा भागात कोयत्याने दहशत निर्माण करणार्‍या 5 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान त्यांचे 4 हून अधिक साथीदार फरार झाले असून त्यांच्या शोध पोलिस पथक घेत आहे. (Pune Crime News)

गगन अमरीकसिंग मिशन (19), अमन युसुफ खान (22, दोघे रा. नाना पेठ), अरसलन तांबोळी (27), मंगेश कैलास चव्हाण (24) आणि गणेश प्रकाश पवार (27, तिघे रा. रविवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार कुणाल राउळ, स्वप्नील शिंदे, सुजल टापरे, मयुर थोरात आणि इतर साथीदार पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दि. 1 जानेवारी रोजी पहाटे काही जणांची आपआपसात भांडणे झत्तली होती. त्या भांडणाचा राग मनात धरून काही सराईत गुन्हेगार हातात कोयते घेवुन नवावाडा परिसरात दहशत निर्माण करीत होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच समर्थ पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यास सुरूवात केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे (API Prasad Lonare), उपनिरीक्षक सौरभ माने (PSI Savrabh Mane) आणि तपास पथकाने हद्दीमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासण्यास सुरूवात केली. पोलिस पथकाने 5 जणांना अटक केली तर त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. (Pune Crime News)

सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे
(Sr. PI Ramesh Sathe), पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे (PI Pramod Waghmare),
सहाय्यक निरीक्षक प्रसाद लोणारे, उपनिरीक्षक सौरभ माने, पोलिस अंमलदार हेमंत पेरणे, दत्तात्रय भोसले,
गणेश वायकर, प्रमोद जगताप, रोहिदास वाघीरे, सुभाष पिंगळे, रहिम शेख, कल्याण बोराडे आणि श्याम सुर्यवंशी
यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title :- Pune Crime News | Samarth Police Arrest 5 criminals who are pune police record

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mahavitaran Strike | संपाच्या 72 तासांमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आपत्कालीन व्यवस्था पूर्णत्वास ; पुणे परिमंडलामध्ये पर्यायी मनुष्यबळाद्वारे 24 तास सेवा राहणार

Maharashtra Politics | मोदींनी नारायण राणेंना चांगलेच खडसावले; ठाकरे गटातील ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

MP Amol Kolhe | छत्रपती संभाजी महाराज ‘स्वराज्यरक्षक’ की ‘धर्मवीर’?, खा. अमोल कोल्हेंनी स्पष्ट केली भूमिका (व्हिडीओ)