Pune Crime News | तडीपार सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | तडीपारीच्या (Tadipar) आदेशाचे उल्लंघन करून शहरात आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला समर्थ पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी ही कारवाई सोमवार पेठेतील एस.व्ही. युनियन गेट जवळ केली. दिपक सुभेदार परदेशी (वय-23 रा. सदाआनंद नगर, सोमवार पेठ, पुणे) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime News )

समर्थ पोलीस ठाण्यातील (Samarth Police Station) तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार हेमंत पेरणे (Police Constable Hemant Perne) यांना माहिती मिळाली की, समर्थ पोलीस ठाण्यातील तडीपार गुन्हेगार दिपक परदेशी हा केईएम हॉस्पिटल (KEM Hospital) समोरील बाजुस असलेल्या एस.व्ही. युनियन गेट शेजारी बसला आहे. माहिती मिळताच तपास पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो विनापरवानगी शहरात आल्याचे निष्पन्न झाले. (Pune Crime News)

आरोपी दिपक परदेशी याला पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांनी पुणे शहर व संपूर्ण जिल्ह्यातून तडीपार केले होते.
तडीपारीच्या आदेशाचा भंग करुन आरोपी शहरात आला होता. पोलिसांनी त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act) कलम 142 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. दिपक परदेशी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), खंडणी (Extortion), बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक
विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Pravin Kumar Patil), परिमंडळ 1 पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल
(DCP Sandeep Singh Gill), सहायक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ (ACP Ashok Dhumal),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर (Senior PI Suraj Bandgar), पोलीस निरीक्षक गुन्हे प्रमोद वाघमारे
(PI Pramod Waghmare) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील रणदिवे (PSI Sunil Randive),
सौरभ थोरवे (PSI Saurabh Thorve), पोलीस अंमदार हेमंत पेरणे, दत्तात्रय भोसले, संतोष डमाळे, गणेश वायकर,
प्रमोद जगताप, रोहिदास वाघेरे, रहीम शेख, अमोल शिंदे, शरद घोरपडे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha By Election | निवडणूक आयोग आणि भाजपला हायकोर्टाची चपराक – मोहन जोशी

Pune Lok Sabha By-Election | पुणे लोकसभेसाठी लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

Pimpri Chinchwad Crime News | बिलाच्या पावत्या एडीट करून पैशांचा अपहार, वायसीएम हॉस्पिटलमधील प्रकार

MLA Disqulification Case | आमदार अपात्रता प्रकरण : ‘या’ कारणासाठी विधानसभा अध्यक्ष देऊ शकतात राजीनामा, रोहित पवारांचं मोठं वक्तव्य

Maharashtra Winter Session 2023 | संसदेतील घुसखोरीच्या घटनेचे विधानसभेत पडसाद, अध्यक्षांनी घेतला महत्वाचा निर्णय

NCP MLA Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांचा घणाघात, नेहमीच सर्व महत्वाची पदे अजितदादांना देणं, हीच शरद पवारांची सर्वात मोठी चूक