Pune Crime News | पार्सल डिलिव्हरीसाठी 2 रुपये पाठवले अन् गमावले लाख रुपये, चिंचवडमधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पार्सल डिलिव्हरी (Parcel Delivery) करण्यासाठी लिंक पाठवून त्यावर दोन रुपये पाठवण्यास सांगून सायबर चोरट्यांनी (Cyber Crime) तरुणाच्या बँक खात्यातून लाख रुपये काढुन घेत आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 2 नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडला आहे. याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत कृष्णा दिलीप केदार (वय-29 रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याने चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) सोमवारी (दि.6) फिर्य़ाद दिली आहे. त्यावरुन 93301XXXXX, 93306XXXXX, 91-62992XXXXX, 76698XXXXX, 98837XXXXX मोबाईल धारक, HDFC व IFSC बँक खाते धारकांवर आयपीसी 420 सह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कृष्णा केदार यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकवर आरोपी मोबाईल धारकांनी
टेक्स मेसेज केला. या मसेजमध्ये दोन लिंक पाठवून त्यांना तुमचे पार्सल डिलिव्हरी करायचे आसून लिंकवर क्लिक
करुन दोन रुपये पाठवण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी लिंकवरुन दोन रुपये पाठवले. त्यानंतर 2 नोव्हेंबर
रोजी दुपारी दीडच्या सुमारास सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांच्या बँक ऑफ इंडिया मधील बँक खात्यातून 99 हजार 999
रुपये काढून घेत आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे (Sr PI Dilip Shinde)
करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, ओबीसींचे नेते आमच्याविरोधात षडयंत्र रचत आहेत, मराठा नेत्यांनी…

Modi Govenment | मोदी सरकारची दिवाळी भेट, सर्वसामान्यांसाठी स्वस्तात ‘भारत आटा’; जाणून घ्या किंमत आणि इतर गोष्टी…

Shree Siddhivinayak Temple Trust | आदेश बांदेकर सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार, शिंदे गटातील ‘या’ आमदाराची नियुक्ती