Pune Crime News | खडकवासल्यातून बचावलेल्या सात वर्षांच्या कुमुदला पडली ऑक्सिजनची गरज

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | खडकवासला धरणात (Khadakwasla Dam) पोहण्यासाठी गेलेल्या ९ मुली बुडाल्या. यामध्ये ७ मुलींना वाचवण्यात यश आले असून २ मुलींचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. गोऱ्हे खुर्द (Gorhe Khurd) येथे पोहण्यासाठी गेलेल्या सात जणींना स्थानिकांनी तातडीने पाण्याबाहेर काढल्यामुळे त्यांना जीवनदान मिळाले. या मुलींना लगेच खानापूर (Khanapur) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन जाण्यात आले. त्यावेळी कुमुद संजय खुर्डे Kumud Sanjay Khurde (वय वर्षे ७) हिला या घटनेचा जास्त धक्का बसला होता व ती घाबरलेली होती. अशा अवस्थेत मुलीला ऑक्सिजनची (Oxygen ) अत्यंत आवश्यकता असल्याने तिला खासगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल करण्यात आले. (Pune Crime News)

पाण्याबाहेर काढलेल्या सात जणींना अडीच तीन किलोमीटरवर असलेल्या खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वागत रिंडे (Dr. Swagat Rinde) व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी प्रथमोपचार (First Aid) केले. यामध्ये कुमूदसह शीतल अशोक लहाने Sheetal Ashok Lahne (वय १६), पायल संजय लहाने Payal Sanjay Lahne (वय १२), राशी सुरेश मांडवे Rashi Suresh Mandve (वय १६), मीना संजय लहाने Meena Sanjay Lahne (वय ३०), पायल संतोष सावळे Payal Santosh Sawle (वय १८), पल्लवी संजय लहाने Pallavi Sanjay Lahne(वय १०) यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. त्यावेळी कुमुदला ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने तिला तातडीने खडकवासला (Khadakwasla Dam Accident) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Pune Crime News)

तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वागत रिंडे यांनी सांगितले की,‘बुडलेल्या व्यक्तींच्या शरीरात प्रामुख्याने
फुफुसात पाणी गेले का, याची दोन- तीन प्रकारे तपासणी केली जाते.
पाणी बाहेर काढणे, बुडाल्यावर घशातील स्त्राव आत जातो.
गुदमरलेले असतात. त्यांचे प्राथमिक उपचार करून रक्तदाब (BP) व शुगर (Sugar) तपासून त्यांना घरी सोडले आहे.’
असे त्यांनी सांगितले.

Web Title :- Pune Crime News | seven year old kumud needed oxygen swimming health center khanapur

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rajnath Singh Pune Visit | संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली बापट कुटुंबियांची सांत्वनपर भेट; बापट यांच्या स्मृतीचे केले स्मरण (VIDEO)

Gulabrao Patil | मी एकट्यानं उद्धव ठाकरेंसोबत राहून काय केलं असतं?, गद्दारीच्या आरोपांवर गुलाबराव पाटलांचे स्पष्टीकरण

Pune PMC News | पालिका आयुक्तांची पूरग्रस्त वसाहतीत धडक कारवाई; नागरिक संतप्त