Pune Crime News | शनिवार पेठ: वडिलांना मारल्याने मुलाने साथीदारांच्या मदतीने केला खूनाचा प्रयत्न; बापाने सोसायटीत जाऊन घातला राडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | वडिलांना मारहाण (Beating) केल्याच्या कारणावरुन मुलाने साथीदारांच्या मदतीने व्यावसायिकाला हाताने व लाकडी स्टंपने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. मुलाला अटक झाल्याचे समजल्यावर बापाने सोसायटीत शिवीगाळ करुन राडा घातल्याचा प्रकार शनिवार पेठेत घडला. (Pune Crime News)

याबाबत सोनल हरिश्चंद्र जाठवडेकर (वय ४२, रा. सुवर्णशिल्प अपार्टमेंट, शनिवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १९७/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संकेत संदीप ताकदोंदे Sanket Sandeep Thaktonde (वय २२, रा. सुवर्णशिल्प अपार्टमेंट, शनिवार पेठ), ओंकार सचिन परदेशी Omkar Sachin Pardeshi (वय २१, रा. नारायण पेठ) आणि सिद्धेश नंदकुमार जाधव Siddhesh Nandkumar Jadhav (वय २१, रा. सदाशिव पेठ) यांना अटक केली आहे. हा प्रकार शनिवार पेठेतील हसबनीस बखळ गल्लीत सोमवारी रात्री साडेदहा वाजता घडला होता. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा लाँड्री व्यवसाय (Laundry Business) आहे.
त्यांच्या सोसायटीत राहणारा संदीप ताकदोंदे (वय ५५) हा नेहमी सोसायटीमधील रहिवाशांना विनाकारण शिवीगाळ
करत असतो. संदीप याने ३० ऑगस्ट रोजी फिर्यादी यांना शिवीगाळ केल्याने त्यांनी हाताने मारहाण केली होती.
सोमवारी रात्री साडेदहा वाजता फिर्यादी दुचाकीवरुन जात असताना हसबनीस बखळ येथील गल्लीत संदीप याचा
मुलगा संकेत ताकदोंदे व त्याच्या मित्रांनी अडविले. संदीप याने माझ्या वडिलांना तू मारहाण केली,
आता तुला जिवंत सोडत नाही़ असे म्हणून शिवीगाळ करुन लाकडी स्टंपने फिर्यादीच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.
इतरांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांनी आरडाओरडा केल्याने लोक जमा होऊ लागल्यावर ते पळून गेले.
पोलिसांनी तिघांना अटक केली. याची माहिती मिळाल्यावर मंगळवारी सकाळी दहा वाजता संदिप ताकदोंदे याने
सोसायटीत अश्लिल शिवीगाळ करुन माझ्या मुलाची कोणी माहिती दिल्यास पाहून घेण्याची धमकी दिली.
एका महिलेच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी संदिप ताकदोंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Kothrud Ganesh Festival 2023 | कोथरूड गणेश फेस्टिव्हलचे आयोजन !
दि. २४ सप्टेंबर रोजी होणार उद्घाटन

पुणे : सेवानिवृत्त अति वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याची दीड कोटींची फसवणूक, प्रचंड खळबळ