Pune Crime News | धक्कादायक ! पत्नी आणि तिच्या 3 मित्रांच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या, बायकोसह चौघांविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पत्नी आणि तिच्या 3 मित्रांच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येरवडा परिसरातील महाराष्ट्र हौसिंग बोर्डमध्ये घडली आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात (Yerwada Police Station) चौघांविरूध्द आत्महत्या (Suicide In Pune) करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

कुणाल संभाजी शिंदे Kunal Sambhaji Shinde (43) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्यांची पत्नी रिता कुणाल शिंदे (Rita Kunal Shinde), तिचे मित्र रितीक राज (Hrithik Raj), स्वप्निल गजरे (Swapnil Gajre) आणि सचिन चांदणे (Sachin Chandne) यांच्याविरूध्द येरवडा पोलिस ठाण्यात भादंवि 306, 34 अन्वये गुरनं 217/2023 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सन 2005 पासुन आजपर्यंत रिता कुणाले शिंदे हिने तिच्या 3 मित्रांच्या मदतीने पती कुणाल शिंदे यास मानसिक त्रास दिला असे फिर्यादीमध्ये म्हंटले आहे. (Pune Crime News)

चौघांनी मिळुन कुणाल शिंदे यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे कुणाल यांनी आत्महत्या केली.
कुणाल यांची आई पुष्पा संभाजी शिंदे (72, रा. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, एल 35, रूम नं. 404) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, येरवडा पोलिसांनी स्वप्निल गजरे याला अटक केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गुरव करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime News | Shocking! Husband commits suicide due to suffering of wife and her 3 friends, crime against four including wife

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray | राम नवमीच्या दिवशी उद्धव ठकरेंचा शिंदे गटाला टोला, म्हणाले-‘सध्या राजकारणात श्रीरामाचे नाव घेऊन दगड…’

Nandurbar Police | नंदुरबार पोलीस दलाच्या ‘अक्षता समिती’ने थांबविला बालविवाह

Nitin Gadkari On Mumbai-Goa Highway | मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी