Pune Crime News | घरगुती गणपती सजावटीच्या विद्युत रोषणाईत शॉर्टसर्किट, युवकाचा झोपेत मृत्यू; पुणे जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

राजगुरुनगर/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | गणपती समोर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमध्ये (Electric Lighting) शॉर्टसर्कीट (Short Circuit) होऊन झोपेतच युवकाचा जळून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथे घडली आहे. वैभव जगन्नाथ गरुड Vaibhav Jagannath Garuda (वय-35 रा. दत्तनगर, खरपुडी बुद्रुक, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत खेड पोलीस ठाण्यात (Khed Police Station) अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, खरपुडी येथील दत्तनगरमध्ये मयत वैभव गरुड हे कुटुंबासह राहत होते. गरुड यांनी घरामध्ये गणपतीची स्थापना केली आहे. त्यांनी गणेश मूर्तीसमोर आकर्षक सजावट (Ganesh Decoration) करुन या सजावटीमध्ये विद्युत लाईटच्या माळा लावल्या होत्या. शनिवारी (दि.23) मध्यरात्री घरात विजेचे शॉर्टसर्कीट होऊन आग लालगी. यामध्ये घरातील साड्या, बेड व इतर वस्तू जळाल्या. (Pune Crime News)

मयत वैभव गरुड हे गादीवर झोपले होते. गादीने पेट घेतल्याने त्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. वैभव हे सर्पमित्र म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुली आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड,
2 गुन्हे उघड

भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा दाखल; गुंतवणुकीचे आमिष दाखवून साडे पाच कोटींचा घातला गंडा,
100 जणांची 25 कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज

Ajit Pawar | पुणे-मुंबई महामार्गावर रोहित पवारांचा ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून फ्लेक्स, अजित पवार म्हणाले – ‘मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न…’