Pune Crime News | गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून रविवार पेठेतून 24 रील नायलॉन मांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell, Pune) प्रतिबंधित मांजाची (Manja) साठवणुक करून विक्री करणार्‍यांवर छापा टाकून 24 रील मांजा जप्त केला आहे. आरोपीविरूध्द खडक पोलिस ठाण्यात (Khadak Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

रविवार पेठेतील एकजण प्रतिबंधित मांजाची साठवणुक करून त्याची विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती.
पोलिस अधिकारी व अंमलदारांनी मिळालेल्या माहितीची खातरजमा केली.
त्यानंतर पथकाने रविवार पेठेत मांजाची साठवणुक करून त्याची विक्री करणार्‍यावर छापा टाकला.
तेथे 17 हजार रूपये किंमतीचा 24 रील मांजा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला आहे.
वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार (Sr PI Vijay Kumbhar), सहाय्यक निरीक्षक अनिकेत पोटे (API Aniket Pote), अश्विनी पाटील (API Ashwini Patil), अंमलदार अजय राणे, आण्णा माने, राजेंद्र कुमावज, नदाफ, पठाण आणि कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. (Pune Crime News)

 

Web Title :- Pune Crime News | Social Security Department of Pune Police Crime Branch seized 24 reels of nylon manja from raviwar peth

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | ‘इन्व्हेस्टमेंट मांगोगे, यूपी-गुजरात को देंगे’, जयंत पाटलांच्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Former MLA Mohan Joshi | कर्नाटक विधानसभा निवडणूक निरीक्षकपदी मोहन जोशी

Anil Deshmukh | काटोल, नरखेड तालुक्यातील जनतेच्या प्रमुख मागणीचे अनिल देशमुखांकडून मुख्यमंत्र्याना पत्र…

MP Arvind Sawant | ‘राज्यातील सरकार घटनाबाह्य’, सत्तासंघर्षाच्या सुनावणीपूर्वी अरविंद सावंतांचा शिंदे सरकारवर घणाघात