Pune Crime News | येरवडा परिसरातील हॉटेल रिट्झ कार्लटॉन मधून संशयित ताब्यात, बनावट कागदपत्रे जप्त

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लोकसभा निवडणुकीच्या (Pune Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराचा धडाका जोरदार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील अनेक भागात सभा घेत आहेत (PM Modi Sabha In Pune). पंतप्रधान मोदी यांची पुण्यातील रेसकोर्स (Pune Race Course) या मैदानावर सभा होणार आहे. या सभेसाठी यासाठी जय्यत तयारी सध्या सुरू आहे. तसेच पुणे पोलिसांकडून (Pune Police) शहरातील सर्व हॉटेल्स, लॉज आणि संशयास्पद ठिकाणांची तपासणी केली जात आहे. येरवडा परिसरात हॉटेलची (Hotels In Yerawada) तपासणी करत असताना पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून बनावट कागदपत्रे (fake Documents) जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई गोल्ड क्लब चौकातील हॉटेल रिट्झ कार्लटॉन (The Ritz-Carlton Pune) येथे करण्यात आली.(Pune Crime News)

अब्दुल्लाह रुमी (वय-48 रा. रिलॅक्स पीडी सर्व्हिसेस, सोमनाथ नगर, वडगाव शेरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक महेश बाबुराव लामखडे (API Mahesh Lamkhde) (वय-36) यांनी
येरवडा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन पोलिसांनी आरोपीवर आयपीसी 420, 465, 468, 471 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल्लाह रुमी हा हॉटेल रिट्झ कर्लटन येथे उतरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस हॉटेल तपास असताना आरोपी बाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलमध्ये जाऊन आरोपीकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने स्वत:ची ओळख लपवण्यासाठी तसेच कोणाची तरी फसवणूक करण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या प्रकारची ओळखपत्र स्वत:जवळ बाळगली होती. त्याच्याकडे विविध पत्त्यांवरील दोन आधारकार्ड, दोन मतदार ओळखपत्रे आढळून आली आहेत. यासोबतच, त्याच्याकडे विविध सिमकार्ड आणि मोबाईल फोन देखील मिळाले आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दोडमिसे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Adv Ujjwal Nikam | भाजपाचे धक्कातंत्र! ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी

Murlidhar Mohol | पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या पर्वती विधानसभेतील रॅलीला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद

Cheating Fraud Case Pimpri Chinchwad | पिंपरी : पोलीस असल्याची बतावणी करुन व्यावसायिकाची फसवणूक, सांगवी पोलिसांकडून तरुणाला अटक