Pune Crime News | कमी किंमतीचे हिरे जास्त किंमतीला देवून 3 कोटी 48 लाखांची फसवणूक ! तनिष्क शोरूममधील सेल्समनला अटक; मॅनेजर, कॅशिअर, बिझनेस मॅनेजर आणि शोरूमच्या मालकाविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | हिरा नेमका कोणता जादा किंमतीचा, त्याचे कॅरेट कसे ओळखायचे याची सामान्यांना माहिती नसते. सेल्समन सांगेल, मनाला भावेल, असे हिर्‍याचे दागिने (Diamond Jewellery) लोक घेत असतात. पण, कमी किंमतीचे हिर्‍याचे दागिने जास्त किंमतीला देऊन नावाजलेल्या शोरुममध्ये फसवणूक (Cheating Case) होत असेल तर, लक्ष्मी रोडवरील उंबर्‍या गणपती चौकातील तनिष्कच्या शोरुममधून (Tanishq Jewellery Showrooms Laxmi Road Pune) एका महिलेची तब्बल ३ कोटी ४८ लाख ८५ हजार ९९७ रुपयांची फसवणूक (Fraud Case) झाली आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (EoW Pune Police) मुख्य सेल्समनला अटक केली आहे. (Pune Crime News)

याबाबत लोणी काळभोर येथील एका ४६ वर्षाच्या महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १४४/२३) दिली आहे. त्यानुसार चेतन विसपुते याला अटक करण्यात आली असून संगिता महाजन (Sangeeta Mahajan), तेजल पवार (Tejal Pawar), अमोल मोहिते (Amol Mohite), सागर धोंडे (Sagar Dhonde), चंदन गुप्ता (Chandan Gupta), धवल महेता (dhawal mehta), शोरूमचे मालक हितेश पुनामिया (Hitesh Punamia) अशा ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पेट्रोल पंप व इतर व्यवसाय आहेत. त्यातून मिळणार्‍या पैशांमधून त्यांनी डिसेबर २०१८ पासून तनिष्कच्या लक्ष्मी रोडवरील शोरुममधून वेळोवेळी ४ कोटी १९ लाख रुपयांचे हिर्‍यांचे दागिने खरेदी केले होते. यावेळी त्या नेहमीच्या ग्राहक असल्याने त्यांनी डिस्काऊंट मागितल्यावर तेथील मॅनेजर, कॅशिअर यांनी त्यांना डिस्काऊंट दिला होता. दरम्यान, जानेवारी २०२३ मध्ये त्यांनी हे हिर्‍याचे दागिने बदलून दुसरे दागिने घेण्यासाठी शोरुममध्ये गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना वेगवेगळी कारणे सांगून दागिने न बदलण्यासाठी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी फोन केले. तरी त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. (Pune Crime News)

तेव्हा त्यांनी तनिष्कच्या दुसर्‍या शो रुममध्ये हे हिर्‍याचे दागिने दाखविले. तेव्हा त्या शो रुममधून त्यांच्याकडील हिर्‍याचे दागिने हे प्रत्यक्षात अत्यंत हलक्या दर्जाचे असल्याचे सांगण्यात आले. त्यांना कमी किंमतीचे हिर्‍याचे दागिने जास्त किंमतीत दिले. जादा रक्कमेचे बनावट बिल तयार करुन त्यावर तनिष्कचे शिक्के मारुन डिस्काऊंट दिल्याचे भासविले. अशा प्रकारे ४ कोटी १९ लाख रुपयांचे हिर्‍याचे दागिन्यांचे वेळोवेळी बिले देऊन प्रत्यक्षात ३ कोटी ४८ लाख ८५ हजार ९९७ रुपयांची फसवणूक केली. शोरुममधील मॅनेजर, कॅशिअर, बिझनेस मॅनेजर आणि मालक यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल करुन मुख्य सेल्समनला अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे (Pune Police Crime Branch) पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर (Sr PI Krishna Indalkar) तपास करीत आहेत.

Web Title :   Pune Crime News | Tanishq Showroom Salesman Arrested; Offense against manager, cashier, business manager and showroom owner in cheating case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्याचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव

Today Horoscope | 5 July Rashifal : मेष, कर्क आणि मीन राशीसाठी दिवस यश देणारा, वाचा १२ राशींचे दैनिक राशीभविष्य

Petrol-Diesel Price Today | पुणे, मुंबईसह प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर काय? जाणून घ्या

Amol Mitkari | “शरद पवार आव्हाडांची खासगी मालमत्ता नाही”; अमोल मिटकरींनी आव्हाडांना खडसावले

Monsoon Update | अनेक राज्यात 8 जुलैपर्यंत मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज