Pune Crime News | ‘यहाँ का डॉन बाल्या भाई’ म्हणत वाहनांची तोडफोड करुन पसरवली दहशत, स्वारगेट परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | परिसरात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने एका दुकानदारावर धारदार शस्त्राने वार केले. तसेच ‘यहाँ का डॉन बाल्या भाई’ असे म्हणत हातातील धारदार शस्त्रे हवेत फिरवून व वाहनांची तोडफोड करुन परिसरात दहशत पसरवली. हा प्रकार स्वारगेट पोलीस ठाण्याच्या (Pune Police) हद्दीतील महर्षीनगर व गुलटेकडी येथील संत नामदेव शाळेजवळ रविवारी (दि.19) रात्री साडे आठच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलिसांनी एका सराईत गुन्हेगार व त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत जितेंद्र महादेव शिंदे (वय-40 रा. महर्षीनगर, पुणे) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) सोमवारी (दि.20) फिर्याद दिली आहे. यावरुन एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलासह त्याच्या इतर तीन अनोळखी साथीदारांवर आयपीसी 307, 427, 504, 506, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचे महर्षीनगर येथे जनरल स्टोअर आहे. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास ते दुकानात असताना आरोपी दुचाकीवरून परिसरात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने आले. अल्पवयीन आरोपीने त्याच्या हातातील धारदार शस्त्र फिर्य़ादी यांच्यावर उगारुन अंगावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच ‘तु जर माझ्या विरुद्ध पोलिसात तक्रार केली तर, तुला मारुन टाकीन’ अशी धमकी फिर्यादी यांना दिली. (Pune Crime News)

यानंतर आरोपींनी जोरजोरात आरडाओरडा करुन दुकानाच्या बाहेर हवेत शस्त्रे फिरवून ‘यहाँ का डॉन बाल्या भाई’ असे म्हणत दहशत पसरवली.
परिसरातून जाताना आरोपींनी रियासत अली समशेर यांच्या दुचाकीची तोडफोड करुन नुकसान केले.
तर त्याठिकाणी उभ्या असलेल्या हसमित डिगळे याला शिवीगाळ करुन एका रिक्षाची काच फोडली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कारके (API Karke) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ललित पाटील पलायन प्रकरण : ललित पाटीलला पळून जाण्यास मदत करणारे दोन पोलीस बडतर्फ