Pune Crime News | दरोड्याच्या गुन्ह्याचा दोन तासात छडा, येरवडा पोलिसांकडून 5 आरोपींना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | धारदार शस्त्राने वार करुन जबरदस्तीने 90 हजार रुपये काढून पळून गेलेल्या आरोपींना येरवडा पोलिसांनी (Pune Police) अवघ्या दोन तासात बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना 14 सप्टेंबर रोजी येरवडा परिसरातील चिमाघाट येथील ब्रिजखाली घडली होती. (Pune Crime News)

आकाश हनुमंत भंडारी उर्फ दशरथ Akash Hanumant Bhandari aka Dasaratha (वय-23 रा. वडारवस्ती, येरवडा), अनुज सोमनाथ जोगदंड Anuj Somnath Jogdand (वय-19 रा. ताडीगुत्ता, येरवडा), योगेश दिलीप नवघणे Yogesh Dilip Navaghne (वय-30 रा. गोकुळनगर, कोंढवा), सलमान फारुख कुरेशी Salman Farooq Qureshi (वय-23 रा. शनी अळी, येरवडा), शिवकुमार संजय शेलार Shivkumar Sanjay Shelar (वय-22 रा. भाडी मंडई, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मुकेश सपकाळ यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयपीसी 394, 395, 397, 120 (ब), 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

घटनेच्या दिवशी फिर्यादी मुकेश सपकाळ हे त्यांच्या मित्रासह चिमाघाट येथील ब्रिज खाली बसले होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन खिशातील 90 हजार रुपये काढून घेऊन पळून गेले होते. पोलिसांनी आरोपींवर दरोड्याचा गुन्हा दाखल करुन शोध सुरु केला. आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार राहुल परदेशी (Police officer Rahul Pardeshi), दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे यांना माहिती मिळाली, दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी येरवडा येथे येणार आहेत. पोलिसांनी आरोपींना शिताफीने पकडून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपास पर्णकुटी पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखेडे (API Mahesh Lamkhede) करीत आहेत. (Pune Crime News)

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (Additional CP Ranjan Kumar Sharma), पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate),
येरवडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील (ACP Sanjay Patil),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम (Senior PI Balkrishna Kadam), पोलीस निरीक्षक गुन्हे कांचन जाधव (PI Kanchan Jadhav),
जयदिप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे (PSI Ankush Dombale),
पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे (PSI Pradeep Surve),
पोलीस अंमलदार गणपत थिकोळे (Police Officer Ganpat Thikole),
दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, अमजद शेख, सागर जगदाळे,
कैलास डुकरे, प्रविण खाटमोडे, अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे,
प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, अजित वाघुले यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | गुन्हे शाखेने दोन परदेशी नागरिकांकडून एमडी, एमडीएमए अंमली पदार्थ जप्त, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त