Pune Crime News | बापानेच केला अडीच वर्षाच्या मुलीचा विनयभंग; जाब विचारणार्‍या पत्नीला केली मारहाण

पुणे : Pune Crime News | दुसर्‍या पतीनेच आपल्या अडीच वर्षाच्या मुलीशी अश्लिल चाळे करीत असल्याचे पाहून जाब विचारला. त्यावर पतीने पत्नीला मारहाण (Beating) करुन जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी खडकी पोलिसांनी बोपोडीतील ३५ वर्षाच्या नराधम बापाला अटक केली आहे. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा दुसरा पती आहे.
फिर्यादी या एका शाळेत नोकरी करतात. तेथेच राहतात. शाळेच्या जिन्याच्या खाली कोणी नाही याची संधी पाहून त्याने आपल्या मुलीबरोबर अश्लिल चाळे केले. हे फिर्यादी यांनी पाहून मोबाईलवर फोटो काढले. त्याचा जाब विचारल्यावर त्याने फिर्यादींना हाताने मारहाण केली. त्यांना शिवीगाळ करुन त्यांचा मोबाईल दरवाज्यावर फेकून देऊन नुकसान केले. हा प्रकार १९ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता घडला होता. त्यानंतर दुसर्‍या दिवशी आरोपीने मुलीला बाथरुमध्ये बोलावून तिच्यासमोर नग्न अवस्थेत उभा असलेला फिर्यादीला दिसून आला. ही बाब कोणाला सांगितल्यास बघून घेण्याची धमकी त्याने फिर्यादीला दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन पतीविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक वालकोळी तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | The father himself molested the two-and-a-half-year-old girl; Wife who asked for Jab was beaten up

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad Crime News | गाडीवरील नियंत्रण सुटल्याने समोरासमोर धडक होऊन कार आणि दुचाकीचा भीषण अपघात

Nashik Crime News | पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Swapnil Joshi | मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीने व्यक्त केली खंत; म्हणाला ‘या’ अभिनेत्रीबरोबर करायचे होते काम