Pune Crime News | क्रौर्याची परिसिमा ! पत्नीच्या अंगावर लघवी करुन हीटरने गुप्तांगाला दिले चटके; भाजलेल्या अवस्थेत बलात्कार करणार्‍या पतीला अटक

पुणे : Pune Crime News | पत्नीचे हात पाय बांधून तिच्या गुप्तांगाला (Private Part) त्याने हीटरने चटके दिले. भाजलेल्या अवस्थेत तिच्यावर बलात्कार (Rape in Pune) केला. तिच्या अवघड जागेत तेलाची बाटली घालून अतिशय क्रुरपणे छळ करुन तिच्या तोंडावर लघवी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी कोंढव्यातील एका ४० वर्षाच्या नराधमाला पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. ही घटना ३० एप्रिल रोजी दुपारी १ ते रात्री बारा वाजेच्या दरम्यान घडली. क्रौर्याची परिसिमा गाठलेल्या या प्रकाराने पोलीसही स्तब्ध झाले. सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना ४ मुले आहेत. फिर्यादीच्या हातात मुलीचा मोबाईल पाहून त्यांच्या पतीला संशय आला. फिर्यादी या कोणाबरोबर बोलत तर नाही ना म्हणून तो त्यांना हाताला धरुन बेडरुममध्ये घेऊन गेला. मुले ओरडत असताना फिर्यादीला नग्न करुन त्यांचे हातपाय बांधले. हीटर गरम करुन त्यांच्या लघवीच्या व शौचाच्या जागेवर चटके दिले (Crime Against Woman). दोन्ही ठिकाणी भाजलेले असताना क्रुररीतीने त्यांच्याशी शारीरीक संबंध (Physical Relationship) केले. त्यानंतर तेलाची बाटली त्यांच्या शौचाच्या जागेत घातली.

त्यांच्या तोंडावर लघवी केली. तुला खूप माज आला आहे.
तुझा माज उतरवितो, म्हणून शिवीगाळ करुन फिर्यादी यांच्या डोक्यात, हाता पायावर खलबत्याने मारहाण केली.
त्यांचा आरडा ओरडा ऐकून बाहेरुन मुलेही अधिक आरडा ओरडा करु लागली. तेव्हा त्याने दरवाजा उघडला.
फिर्यादीची १६ व ११ वर्षाची मुलगी त्यांच्याकडे आल्या असताना ही मुले देखील माझी आहेत की नाही असे म्हणून मुलीबरोबर देखील सेक्स करुन काय हालत करतो, असे म्हणाला. या घटनेनंतर जखमी अवस्थेत फिर्यादी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) पतीला अटक केली आहे.

Web Title :- Pune Crime News | The limits of cruelty! Heater urinates on wife’s genitals; Arrested husband who raped her in burnt state, rape in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा 

Pune NCP News | पुण्यातील राष्ट्रवादी भवनालाही फुटला हुंदका (Video)

PM Kisan-Pune News | पुणे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभासाठी बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातच उपलब्ध

Cm Eknath Shinde | राज्यामध्ये वन्यजीव व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश