Pune Crime News | सुरक्षारक्षकांना मारहाण करुन किर्लोस्कर कंपनीच्या आवारातील चंदनाच्या झाडांची चोरी, 7 ते 8 जणांवर FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कंपनीच्या सुरक्षारक्षकांना (Security Guards) लोखंडी रॉडने मारहाण (Beating) करुन सात ते आठ जणांच्या टोळक्याने 11 हजार रुपये किंमतीची तीन चंदनाची झाडे तोडून (Stealing of Sandalwood Trees) नेले. हा प्रकार (Pune Crime News) मंगळवारी (दि.22) पहाटे साडेचारच्या सुमारास खडकी येथील किर्लोस्कर कंपनीच्या (Kirloskar Company Khadki) आवारात घडला.

याबाबत प्रदिप कृष्णत देशमुख Pradeep Krishnat Deshmukh (वय-45 रा. कृष्ण कॉलनी, काळेवाडी, पुणे) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 7 ते 8 जणांवर आयपीसी 395 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रदीप देशमुख हे किलोस्कर कंपनीत सुपरवायझर (Supervisor) आहेत. 22 ऑगस्टला पहाटेच्या सुमारास तिघेजण कंपनीच्या मागील कंपाऊंडच्या भिंतीवरुन कंपनीच्या आवारात शिरले. त्यामुळे प्रदीपने शिट्टी वाजवली असता, चोरट्यांनी त्यांना धक्काबुक्की करुन खाली बसविले.

शिट्टीचा आवाज ऐकून त्यांच्या मदतीला सुरक्षारक्षक राजेंद्र पाटील (Security Guard Rajendra Patil)
आले असता, इतर चोरट्यांनी त्यांच्या पाठीत रॉड मारुन खाली पाडले.
फिर्यादी आणि आरोपींमध्ये झटापट सुरु असताना आणखी दोन जण हातात रॉड घेऊन आले.
त्यांनी राजेंद्र पाटील यांना रॉडने मारहाण केली. तसेच धमकी देऊन शांत बसण्यास सांगितले.
आम्ही पुर्ण तयारीत आलो आहे. शांत बसा, आम्ही चंदनाची झाडे कापल्यानंतर निघून जाऊ असे सांगितले. (Pune Crime News)

त्यावेळी एक गाडी मेनगेटमधून येवुन झाडे कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कटरच्या सहाय्याने
आवारातील तीन चंदनाची झाडे कापण्यास सुरुवात केली. त्याचवेळी पोलिसांची गाडी आली.
पोलिसांना पाहून चोरटे गाडी घेऊन मेनगेटमधून पळून गेले. चोरट्यांनी कंपनीच्या आवारातील 11 हजार रुपयांची
तीन चंदनाची झाडे कापून नेली आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील (PI Man Singh Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sakshi Chopra | बिग बॉस 17 मध्ये येणार रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा; आपल्या रिव्हिलिंग फॅशनसाठी जाते नावाजली