Pune Crime News | विजपंप सुरु करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पत्नीच्या डोळ्यासमोर दुर्दैवी अंत, कुटुंबाला मोठा धक्का

पुणे (Pune Crime News) : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | विहिरीवरील वीजपंप सुरु करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा (Farmer) विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना पुणे जिल्ह्यातील (Pune district) आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग येथे रविवारी दुपारी घडली. हिरामण रामदास डोके (वय-45) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे (Farmer Death) नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव काशिंबेग येथील माळीमळा येथे शेतकरी हिरामण डोके (Hiraman Doke) कुटुंबीयांसह राहतात. वरपट्टी नावाच्या शेतात त्यांची विहीर आहे. रविवारी दुपारी पिकांना औषध फवारणी करण्यासाठी तसेच विहिरीवरील वीजपंप सुरु करण्यासाठी ते पत्नीसह गेले होते. दुर्दैवाने पाय घसरून डोके विहिरीत पडले. मोटार ठेवण्यासाठी विहिरीत असेल्या लोखंडी खांबाला त्याचे डोके आपटून ते गंभीर जखमी झाले. पती पाण्यात बुडत असताना त्यांच्या पत्नीने मदतीसाठी आरडाओरडा केला.

परिसरात काम करत असलेल्या सुरेश तारू यांनी हिरामण डोके यांना पाण्याबाहेर काढले. त्यांना
तातडीने मंचर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना
तपासून उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषीत केले. घोडेगाव ग्रामीण रुग्णालय (Ghodegaon
Rural Hospital) येथे शवविच्छेदन करण्यात आले. हिरामण डोके यांचा शेती आणि वाहतूक
व्यवसाय होता. त्यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

हे देखील वाचा

Monsoon Update Today | राज्यात मान्सून सक्रिय होण्याचे संकेत, पुढील 3 दिवस पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : pune crime news | the unfortunate end of the farmer before his wifes eyes the family shocked

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update