Pune Crime News | तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलांनी महिला पोलीस उपनिरीक्षकाला केली धक्काबुक्की

पुणे : Pune Crime News | एकमेकीविरुद्ध तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घालून महिला पोलीस उपनिरीक्षकाला (PSI) धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी एका महिला पोलीस उपनिरीक्षकांनी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४९/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुगरा अबुबकार मेमन (वय ३५, रा. एम जी रोड, कॅम्प) आणि कोकीळा मकवाना यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार लष्कर पोलीस ठाण्यात शनिवारी सायंकाळी ७ वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुगरा मेमन आणि कोकीळा मकवाना या दोघी महात्मा गांधी रोडवर पथारी लावतात. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता.
त्यामुळे त्या दोघीही तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्या होत्या.
यावेळी फिर्यादी या त्यांच्याकडे चौकशी करत होत्या.
तेव्हा सुगरा मेमन हिने अरेरावीची भाषा करुन अंगावर धावून गेल्या.
मी कोण आहे तुम्ही मला ओळखले नाही का असे म्हणून दोघीही फिर्यादीच्या जवळ येऊन म्हणाल्या आमची कॅम्पमध्ये चांगली ओळख आहे.
तुम्ही बाहेर पडा, मग तुमचेकडे बघुन घेतो, अशी धमकी दिली. तसेच दोघींनीही फिर्यादी यांच्यासोबत अरेरावीची भाषा करुन गोंधळ घालून फिर्यादी यांना धक्काबुक्की केली. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सुगरा मेमन हिच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | The women who came to file the complaint pushed the female sub-inspector of police