Pune Crime News | रविवार पेठेतील फडके हौद चौकातील एटीएम फोडून चोरट्यांनी 13 लाख 34 हजार लुटले; बँकेला पत्ताच नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | शहरातील रविवार पेठेतील फडके हौद चौकात (Phadke Haud Chowk, Raviwar Peth) गर्दीच्या ठिकाणी असलेले एटीएम सेंटरमधील (ATM Center) मशीन चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील १३ लाख ३४ हजार रुपये लुटून नेले. हा प्रकार फडके हौद चौकाजवळ असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये १० ते १५ जुलैच्या दरम्यान घडला. (Pune Crime News)

 

याबाबत बँकेच्या वतीने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद देण्यात आली आहे. पोलिसांच्या वतीने एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमावा. तेथे सायरन बसवावा, या विषयी वेळोवेळी माहिती दिली जाते. असे असताना बँकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. फडके हौद चौकात असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) गेल्या एक महिन्यांपासून बंद होते. तेथे सुरक्षा रक्षकही नव्हता. एटीएम सेंटरमधील मशीनमध्ये १० जुलै रोजी पैसे भरण्यात आले होते. त्यानंतर १५ जुलै रोजी पुन्हा पैसे भरण्यास कर्मचारी आले. (Pune Crime News)

तेव्हा त्यांना एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने तोडून आतील सर्व कॅश चोरुन नेल्याचे लक्षात आले.
फरासखाना पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी परिसरात चौकशी केली. परंतु, कोणालाही या चोरीची माहिती समजली नाही.
बँक अधिकार्‍यांनी शनिवार असल्याने किती पैसे चोरीला गेले, हे सांगता येत नसल्याचे कळविले.
त्यानंतर त्यांनी सोमवारी व्यवहार तपासल्यावर चोरट्यांनी या एटीएममधून तब्ब्ल १३ लाख ३४ हजार २०० रुपये चोरुन नेल्याचे निष्पन्न झाले.
फरासखाना पोलीस तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Thieves looted 13 lakh 34 thousand by breaking the
ATM in Fadke Houd Chowk in Raviwar peth

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा