MLA Bachchu Kadu | अखेर बच्चू कडूंनी मंत्रीपदावरील दावा सोडला, दिल्लीतून घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसांपासून प्रहार सघटनेचे आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) हे मंत्रीपदामुळे नाराज असल्याची चर्चा होती. बच्चू कडू यांनी गुरुवारी (दि.13) मंत्रीपदावरील दावा सोडणार असल्याचे सांगितले होते. मात्र त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा फोन आल्याचे सांगत आपण आपला निर्णय मंगळवारी (दि.18) जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. अखेर बच्चू कडूंनी (MLA Bachchu Kadu) आज (मंगळवार) मंत्रीपदावरील दावा सोडत असल्याचे (Minister Post) जाहीर केले.

 

बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांनी पाठपुरावा केल्यानंतर राज्य सरकारने (State Government) स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची (Ministry of Disability) घोषणा केल्याने त्यांनी समाधान व्यक्त केलं होतं. तसेच, या मंत्रालयाचा कारभार बच्चू कडूंनाच मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी (NCP Rebellion) करत अजित पवार (Ajit Pawar) गट सत्तेत सामील झाला. मंत्रिपदासाठी तिसरा वाटेकरी म्हणून आला आणि ही आशाही संपल्यात जमा झाल्याची चर्चा होऊ लागली. याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी मंत्रिपदावरील दावा सोडण्याचा निर्णय घेतला.

 

देशामध्ये दोन महत्त्वाच्या बैठका होत आहे. एनडीएची (NDA) बैठक दिल्लीत होत आहे. तर भाजप (BJP) विरोधी पक्षांची बैठक बंगळुरूमध्ये होत आहे. एनडीएच्या बैठकीसाठी आमदार बच्चू कडू दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी आपण मंत्रिपदावरील दावा सोडत असल्याचे जाहीर केले. त्यांनी पाच दिवसांपूर्वी याबाबतचे संकेत दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले होते. त्यानुसार आज त्यांनी आपला निर्णय जाहिर केला.

 

काय म्हणाले बच्चू कडू?

मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचे बच्चू कडू यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं. 40-50 आमदार आहेत. मंत्रीपदं कमी आहेत.
आमदारांमध्ये मंत्रीपदासाठी प्रचंड चढाओढ सुरु आहे. या सगळ्यात माझी भूमिका एका मित्राची आहे.
त्यांनी दिव्यांग मंत्रालय दिलं ही मोठी बाब आहे.
त्यांची अडचण दूर झाली पाहिजे यासाठी मी मंत्रीपदाचा दावा सोडला आहे. त्यांनी आग्रह केला.
ते म्हणत होते की तुम्ही आम्हाला मंत्रीपदी हवे आहात. मी त्यांना सांगितलं की एकंदरीत अडचण आहे.
माझ्यापेक्षा दुसरं जर कुणी त्या ठिकाणी खूश होत असेल तर हरकत नाही, असं बच्चू कडू म्हणाले.

 

Web Title :  MLA Bachchu Kadu | bachchu kadu announces not interested in minister post anymore

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा