Pune Crime News | तोडफोड करुन तीन वाहने पेटवली, वारजे परिरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | वारजे येथील जय भवानी चौकातील तीन दुचाकी पेटवून दिल्या. तसेच एक अॅटो रिक्षा आणि वॅगनर कारची काच फोडून नुकसान केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी संताप व्यक्त करत परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी दोन अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत अनिकेत नवनाथ कांबळे (वय-24 रा. जय भवानी चौक, रामनगर, वारजे) यांनी गुरुवारी (दि. 16) वारजे पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी आरोपींवर आयपीसी 435, 427, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे येथील रामगनगर येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन दुचाकी पेटवण्यात आल्या. तर प्रविण घोलप यांच्या वॅगनर कारच्या काचा फोडून वाहनांचे नुकसान केले. तीन दुचाकींना लागलेल्या आगीत त्याच्या शेजारी उभी असलेल्या सोपान तिडके यांच्या रिक्षाचे देखील नुकसान झाले आहे. या घटनेत एक चारचाकी,
एक रिक्षा आणि तीन दुचाकींचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वारजे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास वारजे पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

जादा परताव्याचे आमिष दाखवून साडेचार कोटींची फसवणूक, पुण्यातील प्रकार

पॅन कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची 14 लाखांची फसवणूक, पुण्यातील उंड्री परिसरातील प्रकार