Pune Crime News | मोक्का गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना लोणी काळभोर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | लोणी काळभोर परिसरात (Loni Kalbhor Police Station) कोयत्याने मारहाण करुन दहशत पसरवणाऱ्या अभिजीत आहेरकर व त्याच्या इतर 4 साथीदारांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी मोक्का कायद्यांतर्गत (Pune Police MCOCA Action) कारवाई केली आहे. या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास दिवेघाटात केली. (Pune Crime News)

प्रणव भारत शिरसाठ (वय 22 रा. आंग्रे वस्ती, लोणी स्टेशन, लोणी काळभोर, पुणे), गौरव गोपीचंद बडदे (वय 25 रा. अंबरनाथ मंदिराजवळ, लोणी काळभोर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींवर आयपीसी 307, 326, 504, 506, 143, 144, 147, 148, 149 आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मोक्का कायद्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. (Pune Crime News)

लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अंमलदार देविकर, वीर यांना माहिती मिळाली की,
लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील मोक्का गुन्ह्यातील दोन फरार आरोपी प्रणव शिरसाठ व गौरव बडदे हे दिवेघाट
उतारावर सकाळ प्रेसच्या जवळ आपली ओळख लपवून थांबले आहे. याबाबत वरिष्ठांना कळवून पोलिसांच्या पथकाने
दोघांना शिताफीने पकडले. आरोपी दोन महिन्यापासून फरार होते. पुढील तपास हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा
(IPS Ranjan Kumar Sharma), पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh), वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण
(Sr PI Shashikant Chavan) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे (PSI Amit Gore)
यांच्यासह तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Crime News | धक्कादायक! शिक्षकाने पत्नी, छोट्या मुलाची केली हत्या, स्वत: घेतला गळफास

Pune Crime News | लोणीकंद : वाघोली परिसरातील बकोरी रोड येथे समलैंगिक संबंधातून बीबीएच्या शेवटच्या वर्षात वर्षात शिकणार्‍या 21 वर्षीय तरूणाचा खून