Pune Crime News | ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक, पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बंगळुरूत जाऊन ड्रग्स माफिया ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil) याला अटक केली. गेल्या 15 दिवसांपासून पुणे पोलिसांना (Pune Police) गुंगारा देणाऱ्या ललित पाटीलच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मात्र या कामगिरी बाबत मुंबई पोलिसांचे कौतुक केले जात असताना दुसरीकडे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. यानंतर पुणे पोलिसांनी अॅक्शन मोडमध्ये येत तपासाला गती दिली आहे. ड्रग्स प्रकरणात पुणे पोलिसांनी ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक केली आहे. नाशिकमध्ये रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime News)

प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम अशी या दोघींची नावे आहेत. ससून रुग्णालयातून (Sasoon Hospital Drug Racket Case) पसार झाल्यानंतर ललित पाटील सातत्याने या दोघींच्या संपर्कात होता. या दोघींनी त्याला ससून हॉस्पिटलमधून पळून जाण्यासाठी मदत केल्याचे बोलले जात आहे. फरार असल्याच्या काळात तो या दोघींच्या सतत संपर्कात होता. महत्त्वाचे म्हणजे, ड्रग्सच्या काळ्या कमाईतून मिळवलेला पैसाही ललितने या दोघींकडे ठेवल्याची माहित आहे.

पुणे पोलिसांचे एक पथक मुंबईला आले आहे तर दुसरे पथक बुधवारी रात्री नाशिकला पोहचले आणि ललित पाटीलच्या
दोन मैत्रिणींना अटक केली. या दोघींना पुण्यात आणण्यात आले असून आज (गुरुवारी) दुपारी शिवाजीनगर न्यायालयात
(Shivajinagar Court Pune) हजर करण्यात येणार आहे. ललित पाटील मेफेड्रॉन (Mephedrone) विक्रीतून
मिळणाऱ्या पैशातील काही वाटा या दोघींवर खर्च करत होता. ललित पाटील दोन आठवडे फरार असताना या दोघींच्या
सतत संपर्कात होता. (Pune Crime News)

पुण्यातून थेट नाशिक गाठले

पुण्याहून फरार झाल्यानंतर ललित पाटील थेट नाशिकला गेला. तेथील त्याच्या निकटवर्तीय महिलेकडे रात्रभर मुक्काम केला.
तिच्याकडून 25 लाखांची रोकड घेऊन तो नाशिकमधून बाहेर पडला, अशी माहिती नाशिक पोलिसांच्या तपासात समोर आली.

बंद कारखान्यात ड्रग्सचे उत्पादन

  • मेफेड्रोन हे ड्रग्स प्रामुख्याने देशाबाहेरून भारतात आणले जाते. ललितकडे मात्र हे ड्रग्स बनवण्यासाठी तज्ज्ञांची टीम होती. त्याचे भाऊ भूषण पाटील एमडी उत्पादन करत होता.
  • ललितने यापूर्वी रांजणगाव येथील एका कारखान्यात 132 किलो एमडी तयार केले. त्यापैकी 112 किलो विकले होते, तर 20 किलो पोलिसांना सापडले होते.
  • यानंतर ललित, भूषण यांनी नाशिक येथील शिंदे गावातील कारखान्यात ड्रग्स बनवण्यास सुरुवात केली. मुंबई पोलिसांनी या कारखान्यावर छापा टाकून 300 किलो एमडी जप्त केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | चोरट्याचा दुकानातील रोख रक्कमेवर डल्ला !चोरटा दोन तासात गजाआड; खडक पोलिसांकडून सव्वा 5 लाखांची रोकड जप्त

Pune PMC Skysign Department | बेकायदा फ्लेक्सबाजी कडे दुर्लक्ष करणार्‍या आकाशचिन्ह विभागाच्या चार निरीक्षकांची बदली