Pune Crime News | पुण्यातील सहकारनगरमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी, महिलांसह लहान मुले जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरात दहा दिवस गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. गुरुवारी मानाच्या पाच गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर इतर गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जन झाले. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीची सांगता शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास झाली. पुण्यात सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असताना सहकारनगरमध्ये हाणामारीची घटना घडली. तळजाई भागात दोन गटांत तुंबळ हाणामारी (Marhan) झाली असून यामध्ये लहान मुले आणि महिला जखमी झाल्या आहेत. (Pune Crime News)

जुन्या वादातून तळजाई परिसरातील शेंडी आणि सूर्या टोळीमध्ये वाद झाला. यानंतर दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. या वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये दोन्ही गट एकमेकांना लाठ्या-काठ्या, दगड-विटा एकमेकांना मारताना दिसत आहेत. यामध्ये काही लहान मुले आणि महिला जखमी झाले आहेत. (Sahakar Nagar Police Station)

शेंडी आणि सूर्या टोळीमध्ये मागील अनेक दिवसांपासून वाद आहे. दोन्ही टोळीची तळजाई परिसरात दहशत आहे. त्यांच्यात अनेक वेळा वाद होत असतात. गुरुवारी दुपारी दोन वाजता दोन्ही टोळीमध्ये वाद झाला. या वादाचे पडसाद गणेश विसर्जन मिरवणुकीत पाहायला मिळाले. दोन्ही टोळ्या लाठ्यांचा वापर करत एकमेकांना भिडले. या घटनेमुळे परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी किती जणांवर गुन्हा दाखल केला आहे? ही माहिती अद्याप समजू शकली नाही.

‘या’ कारणामुळे झाला वाद

सूर्या गणेश मित्रमंडळ आरती करण्यासाठी शिंदे आळीच्या विसर्जन हौदावर आले.
त्यावेळी शेंडी टोळीचे मंडळ असलेल्या इंद्रधनुष्य मंडळाने वाद घातला.
यानंतर दोन्ही टोळ्यांमध्ये बाचाबाची होऊन जोरदार हाणामारी झाली.
यावेळी दोन्ही टोळ्यांनी मिळेल त्या वस्तूने एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
रस्त्यावर पडलेले दगड एकमेकांवर भिरकावण्यात आले. यामध्ये दगड लागल्याने महिला व लहान मुले जखमी झाले.
या घटनेत काही महिला व मुले गंभीर जखमी झाले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Ganeshotsav 2023 | ‘आता तुम्ही कोयता घेऊनच दाखवाच…’, गणपती विसर्जन मिरवणुकीत साकारला देखावा

Pune PMC News | पीएमसी इंजीनियर असोसिएशनच्या वतीने ‘अभियंता दिन सायकल रॅली 2023’ चे आयोजन