Pune Crime News | विमानतळ पोलिसांकडून पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) फॉरेस्ट पार्कमधुन लोहगावकडे (Forest Park Lohegaon) जाणार्‍या रोडवरून जावून लोहगाव-वाघोली रोडवरील (Lohegaon Wagholi Road) इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील 5 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून घातक हत्यारे जप्त करण्यात आली आहे. (Pune Crime News)

 

उमेश राम गायकवाड Umesh Ram Gaikwad (30, रा. साडेसतरा नळी, हडपसर, पुणे), सुर्यकांत धोंडिबा रासगे Suryakant Dhondiba Rasage (42, रा. राजीव गांधी नगर, रासगे आळी, मुंढवा, पुणे), संतोष हरिदास गायकवाड Santosh Haridas Gaikwad (38, रा. रेणुका माता मंदिराजवळ, गायरान वस्ती, केशवनगर, मुंढवा, पुणे), नितीन शंकर जाधव Nitin Shankar Jadhav (29, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा), शेखर सिताराम गायकवाड Shekhar Sitaram Gaikwad (58, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत. त्यांच्याकडून एक मोठा स्क्रु ड्रायव्हर, कटावणी, हेक्साब्लेड फ्रेमसह, दोरी व मिरची पुड असे दरोडयाचे साहित्य आढळून आले असून त्यांच्याकडून ते जप्त करण्यात आले आहेत. (Pune Crime News)

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 6 जुलै 2023 रोजी विमानतळ पोलिस ठाण्यातील प्रभारी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय चंदन, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे आणि तपास पथकातील पोलिस अंमलदार हे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिस नाईक अंकुश जोगदंडे यांना काहीजण फॉरेस्ट पार्कमधुन लोहगावकडे जाणार्‍या रोडवरील झाडीत संशयास्पद बसले असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचुन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता ते सर्व पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी निघाले असल्याचे निष्पन्न झाले.

 

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate),
सहाय्यक पोलिस आयुक्त संजय पाटील (ACP Sanjay Patil)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे (Sr Vilas Sonde), पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगिता माळी (PI Sangeeta Mali), सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय चंदन (API Vijay Chandan), पोलिस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे (Ravindra Dhaware), पोलिस अंमलदार अविनाश शेवाळे, अंकुश जोगदंडे, सचिन कदम, रूपेश पिसाळ, सचिन जाधव, नाना कर्चे, गिरीष नाणेकर, योगेश थोपटे, विशाल निलख, दादा बर्डे आणि ज्ञानेश्वर आवारी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

 

Web Title : Pune Crime News | viman nagar police arrested a gang that was preparing to rob a petrol pump

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Pune Crime News | बिबवेवाडी पोलिसांकडून खुनाच्या गुन्हयात फरार असलेल्या रेकॉर्डवरील आरोपीला अटक

Esha Gupta | अभिनेत्री ईशा गुप्ताच्या बिकनीतील हॉट फोटोशुटने सोशल मीडियावर लावली आग

Ameesha Patel | ‘गदर 2’ मधील अंतर्गत वाद आला चव्हाट्यावर; अमिषा पटेलने केले निर्मात्यांवर गंभीर आरोप