Pune Crime News | वानवडी पोलिसांकडून दोन मोबाईल चोरांना अटक, 2 लाख 39 हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | गाडीच्या डिक्कीत ठेवलेले मोबाईल हँडसेट, वस्तु व रोख रक्कम चोरुन (Mobile Theft) नेणाऱ्या दोघांना वानवडी पोलिसांनी (Pune Police) सापळा रचून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 15 मोबाईलसह चोरीचा इतर मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींकडून 2 लाख 39 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही घटना (Pune Crime News) हडपसर येथील रामटेकडी येथे 24 जुलै रोजी सायंकाळी साडे चार ते साडेसहा या दरम्यान आय ऑन डिजिटल झोनच्या समोरील मोकळ्या मैदानात घडली होती.

याबाबत रिंकु सियाराम कुमार (वय-29 रा. धनकवडी, पुणे) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयपीसी 379 नुसार गुन्हा दाखल करुन आकाश रामलिंग ओव्हाळ (वय-28 रा. रामनगर, हडपसर) आणि सुहान मुनावर खान (वय-18 रा. रामनगर, रामटेकडी, हडपसर) या दोघांना अटक केली आहे. (Pune Crime News)

फिर्यादी यांनी त्यांच्या मोपेड गाडीच्या डिकीमध्ये सॅकबॅग मध्ये वनप्लस मोबाईल हँडसेट, वस्तु व रोख रक्कम ठेवली होती. आय ऑन डिजिटल झोनच्या मोकळ्या जागेत गाडी लॉक करुन पार्क केली होती. चोरट्यांनी फिर्यादी यांच्या गाडीची डिकी उघडून डिकीमधील 45 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे (PSI Santosh Sonawane) यांना तांत्रिक विश्लेषण वरुन आरोपींचे लोकेशन मिळाले. यानंतर तपास पथकातील पोलीस अंमलदार गायकवाड व भोसले यांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले.
अटक केलेल्या आरोपींकडून चोरीच्या गुन्ह्यातील मोबाईल, फायर बोटचे स्मार्ट वॉच, व 16 जीबी पेनड्राईव्ह जप्त केले आहेत. तसेच वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुसऱ्या एका गुन्ह्यातील 14 मोबाईल हँडसेट असा एकूण 2 लाख 39 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक
(IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), सहायक पोलीस आयुक्त शाहुराजे साळवे
(ACP Shahuraje Salve) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे
(Senior PI Bhausaheb Patare), पोलीस निरीक्षक गुन्हे विनय पाटणकर (PI Vinay Patankar) तपास पथकाचे
पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस अंमलदार हरिदास कदम, अतुल गायकवाड, यतिन भोसले, अमोल गायकवाड,
विठ्ठल चोरमले, राहुल माने, राहुल गोसावी, संदिप साळवे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lenovo Launches ‘Lenovo LOQ’ Gaming Laptops Lineup in India: Price, Specs, and Availability Here

Aditya Roy Kapur And Ananya Pandey | आदित्य व अनन्याच्या व्हायरल फोटोंवर पहिल्यांदाच आदित्यने सोडले मौन; म्हणाला ही चांगली गोष्ट