Pune Crime News | वानवडी पोलिस स्टेशन – पत्नीवर अत्याचार केल्याप्रकरणी इराणी कॅफेच्या मालकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | प्रसिद्ध इराणी कॅफेचे (Irani Cafe Pune) मालक सय्यद मोहम्मद रेजा अहमद देखानपूर Sayyed Mohammad Reza Ahmad Dekhanpur (रा. सोपान बाग, घोरपडी) याला कौटुंबिक छळाच्या गुन्ह्यात वानवडी पोलिसांनी (Wanwadi Police Station) अटक केली आहे. आपल्या १३ वर्षाच्या मुलाचा ताबा घेऊ नये, यासाठी ९ कोटी रुपये द्यावेत अथवा सनराईज व हुसैनी बेकरीची (Hussaini Bakery) पूर्ण मालकी देण्याची धमकी दिल्याचे त्यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. (Pune Crime News)

याबाबत एका ३६ वर्षाच्या विवाहितेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २८३/२३) दिली आहे. सय्यद देखानपूर याच्याबरोबरच पोलिसांनी एका महिलेवरही गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा देखानपूर यांच्याशी २००४ मध्ये इराणमध्ये विवाह झाला.
त्यानंतर ते पुण्यात रहायला आले. त्यांना एक १३ वर्षाचा मुलगा आहे. जानेवारी २०२१ मध्ये त्यांनी कोरेगाव पार्क
येथील योगा क्लासला गेले होते. तेथे त्यांची एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलीबरोबर ओळख झाली.
त्यांच्यातून देखानपूर याच्याबरोबर त्यांची मैत्री झाली. ते एकत्र ट्रेकलाही जात असत.
त्यांच्या मैत्रीनंतर देखानपूर याच्या वागणूकीत बदल झाला. त्यातून त्यांच्यात शाब्दिक वाद होऊ लागले.
जेव्हा त्यांनी या मुलीला आपल्या पतीपासून दूर राहण्यास सांगितले.
तेव्हा तिने फिर्यादी यांना त्यांचे आक्षेपार्ह फोटो पाठविले.
त्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय अनैसर्गिक पद्धतीने जबरदस्तीने शारीरीक संबंध (Physical Relationship) केले.
त्यानंतर त्यांनी पतीपासून वेगळे राहण्याचे ठरविले. त्यांनी याबाबत इराणच्या दुतावासाकडे तक्रार केली.
त्यानंतर मुंबईतील दूतावासात सौहार्दपूर्ण संवाद झाला. पण समुपदेशनादरम्यान देखानपूर यांनी त्यांच्या मुलाचा पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे ताब्यात घेतली. फिर्यादी यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने देखानपूर याला राग आला. त्याने मुलाचा ताबा मिळावा, यासाठी कौटुंबिक न्यायालयात (Family Court) अर्ज केला.

मुलाच्या कस्टडीचे बदल्यात ९ कोटी रुपये दे अथवा सनराईज व हुसैनी बेकरीची पूर्ण मालकी देण्याबाबत धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनावणे (PSI Santosh Sonawane) तपास करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | Wanwadi Police Station – Owner of Irani Cafe arrested for abusing his wife

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा