Pune Crime News | पुण्यातील नामवंत हॉस्पीटलमध्ये डेडबॉडीसोबत वॉर्डबॉयनं केलं लाजिरवाणं कृत्य, माणुसकीला काळिमा फासणारी घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | रस्त्यात चक्कर येऊन पडलेल्या रूग्णाला हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहाच्या गळयातील 70 हजार रूपये किंमतीची सोनसाखळी वॉर्डबॉयनं (Wardboy) चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वॉर्डबॉयवर वानवडी पोलिस ठाण्यात (Wanwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानवडीतील रूबी हॉल क्लिनिकमधील (Ruby Hall Clinic) कॅज्युल्टी वॉर्डमध्ये हा प्रकार घडला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.(Pune Crime News)

मारूती किसन भालेराव (36, रा. वानवडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तो हॉस्पीटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून काम करतो. याप्रकरणी दिपक चंदू परदेशी (रा. वैदूवाडी, हडपसर – Hadapsar) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे (Pune Crime News). फिर्यादीचे भाऊ आकाश चंदु परदेशी हे वानवडी परिसरातील जगतापनगर भागातून दि. 25 मार्च रोजी जात होते. त्यांना चक्कर आल्याने ते रस्त्यात खाली पडले. परिसरातील नागरिकांनी त्यांना तात्काळ वानवडीतील रूबी हॉल क्लिनीकमध्ये दाखल केले. उपचारांपुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर दिपक परदेशी हे हॉस्पीटलमध्ये गेले. (Wardboy Stole Deceased’s Gold Chain In Ruby Hall Clinic Wanwadi Pune)

हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी दिपक यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.
मयत आकाश यांच्या गळयात सोनसाखळी होती.
मात्र, हॉस्पीटलमधून त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला त्यावेळी सोनसाखळी गळयात नसल्याचे आढळून आले.
अंत्यसंस्कार झाल्यानंतर याबाबत दिपक परदेशी यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली.
वानवडी पोलिसांनी वॉर्डबॉय भालेराव याच्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष गायकवाड (PSI Santosh Gaikwad) करीत आहेत.
वॉर्डबॉयने केलेले कृत्य हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे.
नामवंत हॉस्पीटलमध्ये हा प्रकार घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title :-  Pune Crime News | Wardboy Stole Deceased’s Gold Chain In Ruby Hall Clinic Wanwadi Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पोलीस असल्याचे सांगून तिघा चोरट्यांनी नेले अमेरिकन डॉलर चोरुन; गांजा बाळगल्याचे सांगत बॅग तपासणी करुन हातचलाखी

Post Office Schemes 2023 | ‘या’ बचत योजनांमध्ये मिळतेय जबरदस्त व्याज, मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांना फायदा